आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती-पत्नीचे भांडण सोडवताना मारहाण, मध्यस्थाचा गेला जीव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पती आणि पत्नीचे भांडण सोडवण्यास गेलेला मित्र पती आणि त्याच्या दुसऱ्या मित्राने बेदम मारहाण केल्याने गंभीर जखमी झाला. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. बुधवारी (दि. २१) आदिवासी वाडा, अागरटाकळी येथे हा प्रकार उघडकीस आला. गुरुवारी (दि. २२) मृताच्या भावाच्या तक्रारीनुसार उपनगर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पोलिसांनी दिलेली माहिती आणि सूरज सूर्यवंशी (रा. अशोक सम्राटनगर, अागरटाकळी) याने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार संशयित खंडू हरी गांगुर्डे (रा. पाथर्डीगाव) याचे अादिवासी वाडा येथे पत्नीसोबत भांडण सुरू असताना चुलता विजय सूर्यवंशी भांडण साेडवण्यास गेला असता संशयित पांडुरंग ऊर्फ पांड्या जाधव याने विजयच्या मानेवर आणि डोक्यात दांडक्याने मारले. यात तो बेशुद्ध पडला. त्यास बिटको रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. संशयितावर रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात अाला.

बातम्या आणखी आहेत...