आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विंचूरजवळील अपघातात एक ठार; 25 जखमी; धार्मिक कार्यक्रमानंतर परतत असताना अपघात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लासलगाव- नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील विंचूरजवळील विष्णूनगर येथे पिकअप अाणि टेम्पाे यांच्यात झालेल्या अपघातात एकजण ठार तर २५ जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये १० जणांची प्रकृती गंभीर असून जखमींना निफाडच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आलेले आहे. 


याबाबत मिळालेली माहिती अशी की, विंचूर एमआयडीसीजवळील म्हसोबा मंदिर येथील कारण आटोपून येवला तालुक्यातील नागडे येथील भाविक घरी परतत असताना ओव्हरटेक करताना टेम्पो (एमएच ४३ एफ २५२२) अाणि टेम्पाे यांच्यात झालेल्या अपघातात एकजण ठार तर २५ जण जखमी झाले. मनोज एकनाथ गांगुर्डे (२२) हा युवक ठार झाला. ताे चांदवडमधील कानड येथील रहिवासी होता. या अपघातात १० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 


जखमींमध्ये १० पुरुष, ८ महिला आणि ७ लहान मुलांचा समावेश आहे. जखमींमधील वैशाली पवार, भास्कर लहरे (६०, रा. कोटमगाव), सोनाली निकम, सुयोग घुमरे, गुरुदास सोनवणे यांच्यावर निफाड येथे उपचार करून नाशिक येथे पाठविण्यात आले. शकुंतला मोरे, संतोष आहेर, योगेश घुमरे, राजश्री घुमरे, बाळूबाई गांगुर्डे, प्रियांका निकम, अनिल मोरे, रोहिणी घुमरे, सुनील घुमरे, गणेश घुमरे, भरती सोनवणे, कौशाबाई अहिरे, नाना अहिरे हे किरकोळ जखमी झाले

बातम्या आणखी आहेत...