आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअर डेक्कनकडून आजपासून तिकिटांचे ऑनलाइन बुकिंग; मुंबई, पुणेसाठी सेवा, वेळापत्रकही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिक-मुंबई अाणि नाशिक-पुणे या मार्गांवर २३ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विमानसेवेच्या तिकिटांचे अाॅनलाईन बुकिंग शुक्रवार (दि.१५) पासून सुरू हाेणार असल्याची माहिती एअर डेक्कनच्या सूत्रांनी दिली. सेवेचे वेळापत्रकही यावेळी जाहीर केले जाणार अाहे. 


केंद्र सरकारने ‘उडे देश का अाम नागरिक’ या ब्रीदवाक्याखाली ‘उडाण’ याेजनेची घाेषणा केली हाेती. यानंतर पहिल्या टप्प्यात नाशिक-मुंबई अाणि नाशिक-पुणे या दाेन मार्गांवर सेवा दिली जाणार अाहे. केंद्रीय विमान उड्डयन मंत्रालयाच्या सूत्रांनी या सेवेचे वेळापत्रक दिले असले, तरी कंपनीने अापले वेळापत्रक अाणि अाॅनलाइन बुकिंग गुरुवार (दि. १४) पासून सुरू करणार असल्याचे जाहीर केले हाेते. काही निवडक भाग्यवंतांना एक रुपयात तर १४२० रुपये अाणि इतर कर अशा सर्वसाधारण तिकिटात प्रवासाची संधी देण्यात येणार असल्याने अनेक नाशिककरांनी कंपनीच्या संकेतस्थळावर गुरुवारी दिवसभर अन् रात्री उशिरापर्यंत तिकीट बुकिंगचे प्रयत्न केले. मात्र, या अनुषंगाने कुठलीच माहिती मिळत नव्हती. 


अनेकांनी टाेल फ्री क्रमांकावर काॅल करून सेवेबाबत माहिती घेतली असता शुक्रवारपासून बुकिंग सुरू हाेणार असून वेळापत्रकही जाहीर हाेणार असल्याची माहिती िमळत हाेती. 

बातम्या आणखी आहेत...