आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक- शिक्षणहक्क कायद्यांतर्गत शाळांमध्ये आर्थिक व दुर्बल घटकांतील मुलांसाठी २५ टक्के राखीव असलेल्या जागांसाठी सध्या प्रवेश प्रक्रिया राबवली जात अाहे. या प्रवेश प्रक्रियेत दोन फेऱ्या पार पडल्या असून नाशिकमध्ये आतापर्यंत ३ हजार ४०० विद्यार्थ्यांचे प्रवेशही पूर्ण झाले आहेत. निम्म्याहून अधिक जागा अजून रिक्त असल्याने या जागांवर वंचित विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी या उद्देशाने शिक्षण विभागातर्फे पुन्हा एकदा अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात अाली आहे. त्याअंतर्गत २६ मे ते ४ जून या दरम्यान ऑनलाइन अर्ज करता येतील. त्यानंतर प्रवेशाची तिसरी सोडत काढली जाणार आहे.
जिल्ह्यातील ४६६ शाळांमधील ६ हजार ५८९ जागांसाठी सध्या प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. पहिल्या दोन फेऱ्यांतर्गत ४ हजार ९०३ विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यापैकी ३ हजार ४०० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. निम्याहून अधिक जागा रिक्त राहिल्या होत्या. दुसऱ्या फेरीची मुदत संपली असून पालक व विद्यार्थ्यांचे लक्ष आता तिसऱ्या सोडतीकडे लागले अाहेत. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज केला नाही, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरलेले आहेत, त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. यापूर्वी अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज २६ मे ते ४ जून या कालावधीत भरता येतील. यानंतर तिसऱ्या सोडतीची प्रक्रिया पार पडेल.
यांना होईल फायदा
वंचित घटकांमध्ये विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग (ओबीसी), विशेष मागास वर्ग (एसबीसी) तसेच एचआयव्हीबाधित, प्रभावित गटातील मुलांना या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल. या मुलांच्या पालकांना उत्पनाच्या दाखल्याची आवश्यकता नसेल. जात प्रमाणपत्र आवश्यक असेल. तसेच एचआयव्ही बाधितांना जिल्हा शल्य चिकित्सक तसेच समकक्ष अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक असेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.