आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भगवे झेंडे, अाकाश कंदिल अन‌् पताका... शहर झाले शिवमय; आज सकाळी निघणार पालखी सोहळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्माेत्सव साेहळा साेमवारी (दि. १९) सर्वत्र अमाप उत्साहात साजरा हाेणार अाहे. शिवजन्माेत्सव साेहळा समितीच्या वतीने सकाळी ९ वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर (गाेल्फ क्लब) जिजाऊ वंदना अाणि शिववंदना हाेणार असून त्यानंतर पालखी साेहळा रंगणार अाहे. ढाेल-ताशांच्या गजरात, पारंपरिक पेहरावात हा पालखी साेहळा हाेणार अाहे. त्यात जिल्हाभरातील एक लाख शिवप्रेमी सहभागी हाेणार असल्याचा दावा संयाेजकांनी केला अाहे. सायंकाळी पारंपरिक मिरवणूक मार्गावरून शिवजयंती मिरवणूक निघणार अाहे. जन्माेत्सव साेहळ्यामुळे शहरात भगवे झेंडे, अाकाशकंदिल अाणि पताका लावण्यात अाले अाहेत. त्याचप्रमाणे शिवपुतळ्यांच्या परिसरात राेषणाई करण्यात अाली अाहे. शिवजन्माेत्सव साेहळा समितीच्या वतीने १८ पगड जाती अाणि बारा बलुतेदारांना बराेबर घेऊन बहुजन समाजाची शिवपालखी निघणार अाहे. 


या साेहळ्यात नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक गावातून शिवप्रेमी सहभागी हाेणार अाहेत. सकाळी पालखीत सहभागी झाल्यानंतर प्रत्येक शिवप्रेमी अापापल्या गावात जयंती साजरी करणार अाहे. सकाळी ९ वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर वंदनाचा कार्यक्रम हाेईल. येथील कार्यक्रम झाल्यावर पालखी काढण्यात येणार अाहे. यात पारंपारिक पेहरावात महिला व पुरुषांसह बच्चेकंपनी सहभागी हाेणार अाहेत. लेझीम पथक, ढाेल पथकाद्वारे वातावरण निर्मिती करण्यात येणार अाहे. 


मिरवणुकीत वारकऱ्यांचे मंडळ अग्रभागी असेल. त्यानंतर विविध चित्ररथांचे सादरीकरण हाेईल. मिरवणुकीत सजविलेले अश्व देखील लक्षवेधी ठरतील. या पालखी साेहळ्यात महिलांचा सहभाग माेठ्या प्रमाणात असेल. पालखीत शिवाजी महाराज व संत तुकाराम यांची भेट, साेन्याच्या नांगराने नांगरणारे शिवाजी महाराज, महिलांची पालखी, संभाजी महाराजांचा रथ, शिवअभिषेक अादी चित्ररथ असतील. या संपूर्ण साेहळ्यात सहभागी हाेणाऱ्या महिला पांढऱ्या रंगाची साडी व भगव्या रंगाचा फेटा, पुरुषांनी पांढरा शर्ट वा झब्बा अाणि भगवा फेटा परिधान करणार अाहेत. 


साेशल मीडियाही झाला भगवा
शिवाजी महाराजांचे फाेटाे, त्यांचे विचार, त्यांचे कर्तृत्व अाणि समाजासमाेर ठेवलेला अादर्श यांविषयीचे सचित्र संदेश फेसबुक, व्हाॅटस अॅप, व्टिटर, इन्स्टाग्राम यांसह साेशल मीडियावर सध्या जाेर धरत अाहेत. संपूर्ण साेशल मीडियाच या संदेशांनी व्यापला अाहे. 


प्रतिमा पूजनाचे फाेटाे साेशल मीडियावर
समितीच्या वतीने मध्यरात्री १२ वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात अाले. शिवप्रेमींनी अापापल्या घरांमध्ये शिवप्रतिमांचे पूजन करून संबंधित फाेटाे साेशल मीडियावर टाकले. त्याचप्रमाणे घरांसमाेर रांगाेळ्या काढून राेषणाईदेखील ठिकठिकाणी केली हाेती. 
देवळाली कॅम्प येथे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शहर परिसरात दुचाकीला भगवे ध्वज लावत भव्य रॅली काढण्यात आली.  


शिवपालखी मार्ग असा असेल 
अनंत कान्हेरे मैदान - खडकाळी सिग्नल- शालिमार- गाडगे महाराज पुतळा- मेनराेड- रविवार कारंजा- हाेळकर पूल- मालेगाव स्टंॅड- पंचवटी कारंजा 


अशी असेल हुतात्मा कान्हेरे मैदानावरील सजावट 
- १०० फूट लांब अाणि ४० फूट उंचीचे बॅनर 
- ६१ फूट उंचीचा भगवा ध्वज 
- ५.५ फूट उंचीचा तांबे धातूचा शिवपुतळा दिल्लीहून मागविण्यात अाला अाहे. 


दुपारी जयंती मिरवणूक; नऊ चित्ररथांची नाेंदणी 
शहरात सकाळी पालखी साेहळा रंगणार असून दुपारी ३ वाजता शिवजयंती मिरवणूकही पारंपारिक मार्गाने अर्थात वाकडी बारव परिसरातून निघणार अाहे. या मिरवणुकीसाठी रात्री उशिरापर्यंत नऊ मंडळांनी चित्ररथाची परवानगी घेतली. ही मिरवणूक दरवर्षी तिथीप्रमाणे साजऱ्या हाेणाऱ्या जयंतीला निघत हाेती. यंदा प्रथमच मिरवणूक १९ फेब्रुवारीला निघणार अाहे. 


मध्यरात्रीच झाले शिवपुतळ्यांचे पूजन 
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्रीच शिवप्रेमींनी सीबीएस, पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, लेखानगर अाणि नाशिकराेड परिसरातील पुतळ्यांचे पूजन केले. यावेळी माेठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित हाेते. 


पालखी साेहळा नवीन मार्गानेच ; पाेलिसांनी नाकारली परवानगी 
शिवजयंतीला काढण्यात येणाऱ्या पालखी मिरवणुकीसाठी शिवजन्माेत्सव साेहळा समितीने निवडलेल्या नवीन मार्गाच्या प्रस्तावावर पाेलिसांनी परवानगी नाकारली. असे असले तरी साेहळा समितीने हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान ते पंचवटी कारंजा याच मार्गावरून पालखी साेहळा काढण्याचे जाहीर केले. 


लक्षवेधी मुद्दे 
- पालखी साेहळ्याला जिल्हाभरातून एक लाख शिवप्रेमींचा असेल सहभाग; संयाेजकांचा दावा 
- पुराेगामी संघटना करणार पालखी साेहळ्यात पाण्याची व्यवस्था 
- साेहळ्यास इंग्लंड येथील वंडर बुक अाॅफ रेकाॅर्ड‌्स अाणि जिनीअस बुक अाॅफ रेकाॅर्ड‌्सचे पथक येणार 
- शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी साेहळ्यात सहभागी 
- बाहेरच्या वाहनांसाठी गाेल्फ मैदानावर पार्किंगची व्यवस्था 
- वैद्यकीय सुविधांची असेल ठिकठिकाणी व्यवस्था 
- चाैकाचाैकात हाेणार शिवपुतळ्यांचे पूजन 
- पहाडी अावाजातील पाेवाड्यांनी ठिकठिकाणी उलगडणार शिवइतिहास 


कायद्यानुसार शक्य नाही 
शिवजन्माेत्सव समितीच्या वतीने पालखी साेहळा काढण्यासाठी पाेलिस प्रशासनाकडे गाेल्फ कल्ब मैदानावरून नवीन मार्गासाठी परवानगी मागण्यात अाली हाेती. मात्र, कायद्यानुसार पारंपरिक मार्गाएेवजी नवीन मार्गाला परवानगी देणे शक्य नाही. 
- लक्ष्मीकांत पाटील, पाेलिस उपअायुक्त 

बातम्या आणखी आहेत...