आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांना दंड; वारंवार टाकल्यास फाैजदारी कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- वारंवार सूचना करूनही उघड्यावर वा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रमाण कमी हाेत नसल्याची बाब लक्षात घेत महापालिका अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी दंडात्मक कारवाईचे अस्त्र उपसले अाहे. दंडात्मक कारवाईनंतरही काेणी वारंवार कचरा टाकत असेल तर त्याच्यावर थेट फाैजदारी केली जाणार अाहे. सर्वाधिक लक्ष मंगल कार्यालये व लॉन्सचालकांवर असणार असून, त्यांच्याकडून अस्वच्छता झाल्यास कठाेर कारवाई करण्यात येणार अाहे. 


पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छता अभियानात नाशिकची गतवर्षी चांगलीच घसरण झाली. सन २०१६ मध्ये झालेल्या स्वच्छ सर्वेक्षणात ३१ व्या क्रमांकावर असलेले नाशिक २०१७ मधील सर्वेक्षणात १५१व्या स्थानावर घसरले. त्यात अाता नाशिक महापालिकेची सत्ता भाजपकडे असल्यामुळे व त्यात मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतले असल्यामुळे अपेक्षा अधिक अाहेत. खुद्द मुख्यमंत्र्यांनीही देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये नाशिकचा समावेश हाेण्याची अपेक्षा व्यक्त केल्यामुळे पालिका प्रशासनाची जबाबदारी वाढली अाहे. या पार्श्वभूमीवर अाता अायुक्त कृष्णा यांनी उघड्यावर अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईसाठी कठाेर उपाय उचलणे सुरू केले अाहे. त्याचाच एक भाग म्हणून उघड्यावर अस्वच्छता करणाऱ्यांना जागेवरच दंड केला जाणार अाहे. विभागीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथके स्थापन करून ही कारवाई हाेईल. 


निम्मेच कचरा विलगीकरणाचाही फटका 
महापालिकेने प्रभावी जागृती केल्यानंतरही ओला व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण हाेत नसल्याचे चित्र अाहे. 'दिव्य मराठी'ने महापाैर रंजना भानसी यांच्याच 'रामायण' या पालिकेच्या ओला व सुका कचऱ्याच्या वर्गीकरण कसे हाेत नाही यावर प्रकाश टाकला हाेता. स्वच्छ सर्वेक्षणात विशिष्ट गुण असून त्यात पालिकेची घसरण हाेण्याची भीती अाहे. नाशिकमध्ये सद्यस्थितीत ५० टक्के घरांमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात येत असल्याचे अायुक्तांनीही कबूल केले. 


स्वच्छता तपासणीसाठी केंद्राचे पथक बुधवारी येण्याची शक्यता 
केंद्र शासनाचे पथक स्वच्छ सर्वेक्षणासाठी बुधवारी दाखल हाेण्याची शक्यता अाहे. संबंधित पथकाचा महापालिकेशी संबंध नसल्यामुळे त्याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. हे पथक तटस्थपणाने शहरातील स्वच्छतेची पाहणी करून जाणार अाहे. दरम्यान, या तपासणीच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छतेबाबत दक्षता घेतली जात अाहे. सार्वजनिक स्वच्छतागृहे, बसस्थानके, रेल्वेस्थानकावरील स्वच्छता वाढवली अाहे. उघड्यावर शाैच करणाऱ्यांवर भरारी पथकामार्फत कारवाई केली जात अाहे. 

बातम्या आणखी आहेत...