आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक जिल्ह्यात पेट्राेल,डिझेलच्या साठ्यांचा पेट्रोलियम मंत्रालय व ‘अाेएनजीसी’कडून शाेध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिंडाेरी- नाशिक जिल्ह्यातील दिंडाेरी तालुक्यातील आदिवासी पश्चिम भागातील नाळेगाव शिवारात बुधवारी (दि. १४) सकाळी ११ वाजेपासून भारत सरकार पेट्रोलियम मंत्रालय व अल्फा जी. ओ. इंडिया प्रा. लिमिटेड (अाेएनजीसी) यांच्या मार्फत पेट्रोलियम साठ्यांचे संशोधन चालू करण्यात अाले अाहे. डिझेल-पेट्रोलसाठ्याची शक्यता असल्याने या परिसरात असलेल्या शेतजमिनीत १०० ते २०० फूट बोअरवेल करून त्यात १४ किलोच्या सुरुंगाचे स्फाेट करण्यात अाले. त्याअाधी तज्ज्ञांच्या उपस्थितीत उपग्रहाद्वारे या जमीनीखालील भागाची तपासणीही करण्यात अाली.


नाळेगाव परिसरात भूगर्मात पेट्राेल- डिझेलचे साठे असल्याचा निष्कर्ष पेट्राेलियम कंपनीच्या तज्ज्ञांची तपासणीअंती काढला अाहे. त्या अाधारे बुधवारी सकाळपासूनच या भागातील जमीनीत खाेदकाम व भूसुरुंग लावून स्फाेट करण्याचे काम सुरू झाले. अाधी बोअरवेलच्या बाजूला छोटासा खड्डा करून त्यात सॅटेलाइट मशिनरीद्वारे जमिनीच्या अंतर्गत भागातील पाच किलोमीटरच्या परिसरातील अंतर्गत भूभागाचे फाेटाे संगणकाद्वारे घेण्यात अाले. या माध्यमातून घेऊन पेट्रोल-डिझेलच्या साठ्याचा शाेध घेण्याचा तज्ज्ञांकडून प्रयत्न करण्यात अाला. त्यात सकारात्मक संकेत मिळाल्यानंतर पुढील चाचण्या सुरू करण्यात येत अाहेत.  कंपनीकडून नाळेगाव शिवारात संशोधन कक्ष बसविण्यात अाला अाहे. संगणकतज्ज्ञही कार्यरत आहे. जमिनीखालील नमुने घेतले जात अाहेत. परिसरात खनिजांचा साठा अाहे किंवा नाही याबाबतचे संशोधन पुढील वर्षी  होणार असल्याची माहिती या कामावरील वरिष्ठ अभियंत्यांनी दिली. मात्र  अातापासूनच या ठिकाणी बोअरवेलच्या ट्रक, ट्रॅक्टरसह ५० ते ६० वाहनांसोबत १३० ते १५० कर्मचारी कार्यरत आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये अापल्या गावात डिझेल-पेट्राेलचा शोध लागतो की नाही याबाबत एकच चर्चा हाेत आहे.

 

साठे असण्याची शक्यता 
राज्यातील काही भागात हायड्रो कार्बनचे साठे असण्याची शक्यता ओएनजेसीने केंद्राकडे केली आहे. त्यानुसार नाशिकमधील भूकंपप्रवण क्षेत्रातील कळवण, दळवट, कनाशी, अभोणा, दिंडोरी या परिसरात प्राथमिक सर्वेक्षण हाेत आहे.
-राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी, नाशिक

बातम्या आणखी आहेत...