आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२० दिवसांंनंतर भडका; शहरात पेट्राेल ८३.१२ रुपयांवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक असल्याने तब्बल २० दिवस इंधन दरवाढ राेखून धरण्यात अाली हाेती. मात्र मतदानानंतर दरवाढ केल्याने महागाईचा भडका उडाला अाहे. दरराेज इंधनाचे नवनवे दर जाहीर करणाऱ्या पेट्राेलियम कंपन्यांनी २४ एप्रिल ते १२ मे असे वीस दिवस पेट्राेलचे दर ८२.७७ रुपये तर डिझेलचे दर ६८.४३ रुपयांवर स्थिर ठेवले गेले, मात्र हेच दर १३ मे राेजी ८२.८७ रुपये प्रति लिटर (पेट्राेल) तर ६९.६७ रुपये प्रति लिटर (डिझेल) असे वाढले. दाेनच दिवसात म्हणजे १५ मे राेजी शहरात पेट्राेलचे दर ८३ रुपयांचा अाकडा पार करीत ८३.१२ रुपयांवर तर डिझेलचे दर ६९.९० रुपयांवर पाेहाेचले अाहेत. इंधनदरवाढीचा हा भडका सामान्यांच्या असंताेषाचे कारण बनू पहात अाहे. 

 

अांतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर भडकत असल्याने स्थानिक बाजारातही पेट्राेल-डिझेलचे दर भडकत असल्याचे तज्ज्ञ सांगत असले तरी इंधनावर सरकारी करांचा लादलेला बाेजा जीएसटीमध्ये अंतर्भाव करून संपुष्टात अाणावा, असे मत अाता प्रकर्षाने व्यक्त हाेऊ लागले अाहे. इंधन दरवाढीचा परिणाम एकूणच महागाई वाढविण्यास हातभार लावत असून ज्याचा सर्वाधिक फटका सामान्यांना बसत अाहे. मासिक वेतनात अापल्या कुटुंबाचे महिन्याचे बजेट कसे सांभाळायचे याची कसरत सामान्यांना करावी लागत अाहे. गृहिणींमध्ये तर इंधनदरवाढीबाबत प्रचंड असंताेष पहायला मिळत अाहे. 


इंधनदरवाढीचा भडका उडत असताना सामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने पाऊल उचलावे याकरिता विराेधी पक्षांकडून तीव्र अांदाेलनाची प्रतीक्षा सामान्यांकडून पहायला मिळत अाहे. दिनांक पेट्राेलचे दर 
२९ फेब्रुवारी २०१८ ७९.९० रुपये 
१६ मार्च २०१८ ८०.६८ रुपये 
३१ मार्च २०१८ ८१.८७ रुपये 
२४ एप्रिल २०१८ ८२.७७ रुपये 
१३ मे २०१८ ८२.९७ रुपये 
१५ मे २०१८ ८३.१२ रुपये 

बातम्या आणखी आहेत...