आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खमलाबाद शिवारातील हुक्का पार्लरवर छापा, 10 युवकांसह दाेन युवती ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मखमलाबाद शिवारातील सुयाेजित गार्डननजीकच्या ‘हबीबी फॅमिली रेस्टाॅरंटवर’ म्हसरूळ पाेलिसांनी मंगळवारी (दि. १२) रात्री ११ वाजेच्या सुमारास छापा टाकला असता या ठिकाणी हुक्का पार्लरच्या नावे सर्रासपणे युवक-युवती अवैध मद्यपान धूम्रपान करताना अाढळून अाले. याप्रकरणी पाेलिसांनी हॉटेलमालकासह १० युवक आणि दोन युवतींना ताब्यात घेतले असून हॉटेलमध्ये दोन बालकामगार सापडल्याने जागामालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 


पाेलिस उपअायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ही कारवाई केली. गेल्या काही महिन्यांपासून शहरात हुक्का पार्लरच्या नावे जागाेजागी युवक-युवती एकत्र येऊन मद्यपान-धुम्रपान करीत असल्याचे दिसत असल्याने सर्वच स्तरातून असे प्रकार बंद करण्याची मागणी पाेलिस अायुक्तांकडे करण्यात अाली. 


काॅलेज राेड, गंगापूरराेड, पाथर्डी फाटा, पंचवटी, म्हसरूळ, इंदिरानगर भागात माेट्या संख्येने सुरू झालेले हुक्का पार्लर पाेलिसांनी सक्तीने बंद केले. मात्र, गेल्या पंधरवाड्यातच हुक्का पार्लर चालविणाऱ्या हाॅटेल्सच्या चालकांनी एकत्रित येऊन पाेलिसांच्याल कारवाईला न्यायालयाच्या अादेशाचा संर्दभ देत अाव्हान दिले. त्यानंतर काहींनी कायद्यातील पळवाटा शाेधून हुक्का पार्लर पुन्हा सुरू केले. मात्र, हे सुरू करताना पाेलिसांकडून याठिकाणी कुठेही मद्यविक्री, धुम्रपान हाेणार नाही. खाद्यपदार्थांची विक्रीही हाेणार नसल्याची हमी देण्यात अाली हाेती. या पार्श्वभूमीवर मखमलाबाद पुन्हा सुरू झालेल्या हुक्का पार्लरची पाेलिसांनी तपासणी सुरू केली असता ‘हबीबी रेस्टाॅरन्ट मध्ये हा प्रकार उघडकीस अाला. 


खात्री पटताच कारवाई
हबीबी रेस्टाॅरन्टचे मालक जितेंद्र बिहारीलाल उपाध्याय यांना भेटून म्हसरूळ पाेलिस ठाण्याचे साध्या वेशातील कर्मचारी ग्राहक म्हणून प्रवेश केला. याठिकाणी सीसीटीव्ही फुटेजसह इतर सुविधा बघून अातमध्ये डाेकावून बघितले असता युवक-युवती हुक्का अाेढतानाच साेबत बीअर पिताना दिसून अाल्या.ताेच कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना कळवित छापा टाकला. यात, मालक उपाध्यायसह ग्राहक सौरभ गायकवाड, रितेश देव, समीर बाल, दीपांश गर्ग, अपूर्व तेंडुलकर, प्रसाद राजपूत, अभिजित पाटील, सौरभ डांगे, शेख जुनेद अल्ताफ आदींसह दोन युवतींना ताब्यात घेतले. 


या ठिकाणी हुक्का पिण्यासाठी असलेले साहित्य,मद्याच्या बाटल्या जप्त केल्या. सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, वरिष्ठ निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख, सहायक निरीक्षक एस. व्ही. बेडवाल इतर कर्मचार्‍यांसह घटनास्थळी जाऊन कारवाई केली. पाेलिसांनी उपाध्यायसह हुक्का पार्लरसाठी जागा भाड्याने देणारे जागामालक युवराज माळी यांच्या विरूद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेलमध्ये दोन बालकामगार सापडल्याने कामगार उपायुक्तांना माहिती देत स्वंतत्र गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 


युवतींना अाई-वडीलांच्या स्वाधीन
याठिकाणीहुक्का बीअर पिवून नशेत धुंद झालेल्या दाेघा युवतींची पाेलिसांनी चाैकशी करीत त्यांच्या अाई-वडिलांना हाॅटेलमध्ये बाेलावले. त्यांची परिस्थिती बघवत नसताना त्यांच्या स्वाधीन केले. 

बातम्या आणखी आहेत...