आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेची कचरापेटी 11121 रुपयांची, शिवसेनेची खरेदी केवळ 1152 रुपयांत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेनेच्या नगरसेवकांनी अल्प दरात अाणलेल्या कचरापेट्या अाराेग्य अधिकाऱ्यांना भेट दिल्या. - Divya Marathi
शिवसेनेच्या नगरसेवकांनी अल्प दरात अाणलेल्या कचरापेट्या अाराेग्य अधिकाऱ्यांना भेट दिल्या.

नाशिक- महापालिकेने खरेदी केलेल्या कचरापेटीची किंमत ११ हजार १२१ रुपये क्षमता ५५ लिटर, तर शिवसेनेने एका नामांकित कंपनीच्या खरेदी केलेल्या कचरापेटीची जीएसटीसह किंमत एक हजार १५२ रुपये क्षमता ८० लिटर... म्हणजेच एका कचरापेटीमागे तब्बल नऊ हजार ५६९ रुपयांचा भ्रष्टाचार महापालिका प्रशासनाने केल्याचा अाक्षेप घेत शिवसेनेच्या नगरसेवकांनी अाराेग्याधिकाऱ्यांना ८० लिटरच्या दाेन कचरापेट्या भेट दिल्या. कचरापेट्यांसाेबत देयकाची एक प्रतही देत या संपूर्ण प्रकरणाची चाैकशी करण्याची मागणी शिवसेनेने केली. 


‘कचराकुंडीमुक्त नाशिक’ला हरताळ फासत ‘कचराकुंडीयुक्त नाशिक’ करताना महापालिकेने खरेदी केलेल्या १८९ कचरापेट्यात लाखाे रुपयांचा घाेटाळा झाला असून कचरापेटीची किंमत प्रशासनाने तब्बल ११ हजार १२१ रुपयांपर्यंत दाखविल्याचा अाराेप विराेधी पक्षनेते अजय बाेरस्ते यांनी केला केला हाेता. या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी शिवसेना अाक्रमक हाेईल, असा इशाराही त्यांच्यासह गटनेते विलास शिंदे यांनी दिला हाेता. त्यानुसार शिवसेनेने अाराेग्याधिकारी सुनील बुकाने अतिरिक्त अायुक्त किशाेर बाेर्डे यांची भेट घेत त्यांना कचरापेट्यांच्या खरेदीची माहिती विचारली. प्रत्येकी दोन नग ५५ लिटर क्षमतेच्या कचरापेटीची खरेदी सर्वात कमी दर देणाऱ्या नाशिकच्याच रोटोमॅटिक कंटेनर्स या कंपनीकडून करण्यात आली असल्याचे सांगत तीन फूट उंचीच्या या कचरापेटीची किंमत ११ हजार १२१ रुपये असल्याचे अाराेग्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यावर बाेरस्ते यांनी अाक्षेप घेत नगरसेवक प्रशांत दिवे यांनी दुकानातून उर्वरित.पान 


‘स्वच्छ भारत’ परीक्षेपुरत्याच कचराकुंड्या ! 
कचरापेटीखरेदीचे समर्थन करताना अाराेग्याधिकारी सुनील बुकानेे यांनी अजब उत्तर दिले. ते म्हणाले की, पहिल्या टप्प्यात १८९ डस्टबिन खरेदी करण्यात आले असून, एकूण ६०० कचरापेटी घेण्यात येणार अाहेत. या कचरापेट्या कायमस्वरूपी नसून केवळ १५ दिवसांकरिता असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत असलेल्या स्वच्छ शहर स्पर्धेत नाशिकचा क्रमांक देशातील पहिल्या दहा शहरांत येण्यासाठी या पेट्या खरेदी करण्यात अाल्या. या स्पर्धेत कचरापेट्यांसाठी २१ गुण अाहेत. हे गुण एकदाचे पदरी पडले की, पेट्या एखाद्या शाळेला, वसतिगृहाला वा अन्यत्र भेट देऊन टाकू असे सांगताच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी डोक्यावर हात मारून घेतला. कचरापेट्या घोटाळ्याबरोबरच केवळ परीक्षेपुरता कचरापेटी लावून आपण पंतप्रधान मोदी आणि शासनाची फसवणूक करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात अाला. 


बंदूकधारी सुरक्षा रक्षकही फिरले माघारी 
शिवसेनेचे शिष्टमंडळ अाराेग्याधिकाऱ्यांकडे कचरापेटी भेट देण्यासाठी जाणार, असे लक्षात अाल्यावर बंदूकधारी सुरक्षारक्षकांना पाचारण करण्यात अाले. त्याला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अाक्षेप घेत ‘अाम्ही एेरेगैरे अाहाेत का, लाेकप्रतिनिधींना प्रशासन अशाप्रकारची वागणूक देणार असेल तर त्याचा अाम्ही समाचार घेऊ’, असे खडेबाेल सुनावल्यानंतर संबंधित सुरक्षारक्षकांना माघारी पाठविण्यात अाले. 


हीच का भ्रष्टाचाराच्या पेट्यांची ‘पारदर्शकता’? 
अाम्ही घेतलेल्या कचरापेट्यांतून अाराेग्य विभागाचे पितळ उघडे पडले. लाखाेंची कमाई या विभागातील अधिकाऱ्यांनी केल्याचे यावरून स्पष्ट हाेते. ‘कचराकुंडीमुक्त नाशिक’मध्ये भ्रष्टाचाराच्या कुंड्या मांडून प्रशासन भाजपच्या सत्ताधाऱ्यांबराेबर अनाेखे पारदर्शकतेचे तत्व पाळत अाहे. या प्रकाराची चौकशी झाल्यास महासभा होऊ देणार नाही. 
-अजय बाेरस्ते, विराेधी पक्षनेता 


दर्जा अाणि किमतीविषयी चाैकशी 
व्यावसायिक परिसरात कचरापेट्या ठेवण्याच्या शासनाच्या मार्गदर्शक सूचना अाहेत. त्यानुसारच कचरापेट्यांची खरेदी करण्यात अाली अाहे. मात्र, या पेट्यांंचा दर्जा अाणि त्यांची किंमत याविषयी चाैकशी सुरू करण्यात अाली अाहे. यानंतरच सारे स्पष्ट हाेईल. 
- अभिषेक कृष्णा, अायुक्त 

बातम्या आणखी आहेत...