आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
अलिकेडच इंदूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात तसेच नाशिकमधील अतिप्रतिष्ठातांच्या बैठकीत पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही मुंढेंच्या नियुक्तीबाबत सूताेवाच केल्याच्या चर्चेमुळे त्यांचाही यामध्ये महत्त्वाचा 'रोल' असण्याची शक्यता अाहे. मुंढे यांची अाजवरची वादग्रस्त कारकिर्द बघता अाता भाजपातच अधिक अस्वस्थतेचे वातावरण असून त्यातून संघर्षाचे बाण सुटण्याची शक्यता अाहे. परिणामी बहुसंख्य नगरसेवकांमध्येही अाता काही खरे नाही अशी प्रतिक्रिया उमटत हाेती.
जेमतेम १ वर्ष सात महिने कार्यकाळ भूषवणाऱ्या कृष्णा यांची कामकाजात हाताेटी हाेती. प्रशासकीय नियमांचा बागुलबुवा न करता मार्ग शाेधून कामे निकाली काढली जात असल्यामुळे नगरसेवकही त्यांच्यावर खूश हाेते. मात्र भाजपातील अंतर्गत वादात खासकरून पदाधिकाऱ्यांमधील शीतयुद्धाचा फटका कृष्णा यांना बसला. त्यातून त्यांची बदली झाल्यानंतर नवीन अायुक्तांचे नाव एेकून सर्वाधिक धक्का भाजप नगरसेवकांनाच बसला. मंगळवारी दुपारी कृष्णा यांच्या बदलीच्या बातमीपेक्षा मुंढे यांच्या नियुक्तीमुळेच नगरसेवक व अधिकारी हादरून गेल्याचे चित्र हाेते. मुंढे हे शिस्तप्रिय असले तरी, अशी शिस्त शाळेत ठिक अाहे, महापालिकेसारख्या संस्थेत कामकाज करताना लाेकप्रतिनिधी विरूद्ध अधिकारी अशा संघर्षाला त्यांची कार्यपध्दती कारण ठरेल अशी प्रतिक्रिया व्यक्त हाेत हाेती. त्याबराेबरच सर्वाधिक महत्वाची चर्चा मुख्यमंत्र्यांनी भाजपातील अंतर्गत वादावर टाेकाचा उतारा याेजल्याचीही हाेती.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी स्थानिक भाजप अामदारांना एकत्र येवून कामकाज करण्याचा सल्ला दिला हाेता. पक्षाची हाेणारी बदनामी, दत्तक नाशिकचे स्वप्न भंगल्यास भाजपला संभावणारा दूरगामी झटका याबाबत मुख्यमंत्र्यांनी अवगत करून दिले हाेते मात्र त्यानंतरही अामदार व पालिका पदाधिकाऱ्यांमधील धुसफूस थांबलेली नव्हती. अनेक वादग्रस्त विषय महापालिकेत मंजुरीचा सपाटा सुरू झाला हाेता. नेमके हेच विषय नाराज गटाने मुख्यमंत्र्यापर्यंत पाेहचवल्यामुळे त्यांनी मुंढे यांचे कार्ड महापालिकेसाठी वापरल्याचे सांगितले जाते. यात पालकमंत्री महाजन यांनीही सावध भूमिका घेत पुरेपूर पाठिंबा दिल्याचे बाेलले जाते. दरम्यान, विशिष्ट समाजातील अधिकारीच नाशिकमध्ये महत्वाच्या पदावर येवू लागल्यामुळे भाजपातच अस्वस्थेतेचे वातावरण वाढू लागल्याची चर्चा आहे.
अपयश भाजपाचे; बळी कृष्णांचा : प्रगती पुस्तकात उत्तम श्रेणीत असूनही बदली झाल्यामुळे कृष्णा यांचा भाजपच्या वर्षभरातील अपयशी कामगिरीमुळे बळी गेल्याची चर्चा हाेती. मुळात तीन महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील प्रकल्पांना वेग मिळत नसल्यामुळे कृष्णा यांच्या बदलीची चर्चा हाेती मात्र महापालिकेमार्फत बससेवा सुरू केल्यास हाेणारा ८० काेटीचा घाटा, ईईएसएलसारख्या वादग्रस्त कंपनीला एलईडीचे कंत्राट देणे, सीसीटीव्हीचा महापालिकेच्या अखत्यारित नसलेला विषय अादी कारणामुळे हाेणाऱ्या नुकसानीचा विचार करता कृष्णा यांनी अास्ते कदम धोरण स्वीकारले होते. मात्र, असे असतानाही त्यांची तडकाफडकी बदली झाल्याने ती सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.