आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दप्तर तपासणीच्या माध्यमातून पारदर्शक कारभाराला प्राधान्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- प्रत्येक गावातील सरकारी कार्यालयातील दप्तर तपासणी ही १०० टक्के झाली तर बोगस कामे होणारच नाही. स्थानिक पातळीवरच नागरिकांच्या समस्यांचा निपटारा होईल, यासाठी विभागीय कार्यालयातून प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड करण्यात आली आहे. त्या ठिकाणी सखोल दप्तर तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये जो अधिकारी किंवा कर्मचारी दोषी आढळून आला तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. दप्तर तपासणीच्या माध्यमातून विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी पारदर्शक कारभाराला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रामसेवक, तलाठी, सर्कल, गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांनी दैनंदिन दप्तर परिपूर्ण ठेवण्याची गरज आहे. यामध्ये जो कर्मचारी वा अधिकारी दोषी आढळेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. 


नाशिक विभागात सध्या जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून नव्याने कामे हाती घेण्यात आली आहे. ही सर्व कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण केले जाणार असून, जी महत्त्वाची कामे आहे त्यांनाच मंजुरी दिल्याचे विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. मनरेगाच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देण्यात येत असून नाशिक जिल्हा राज्यात प्रथम ठरला आहे. 


जलयुक्तच्या कामांचा आढावा घेण्यासाठी दर महिन्याला बैठकीचे आयोजन केले जात अाहे. आतापर्यत झालेल्या कामामुळे टँकरची संख्या खूपच कमी झाली आहे. बचत झालेल्या पाण्यामुळे कृषीक्षेत्राला लाभ झाल्याचे झगडे यांनी सांगितले. यावेळी कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, मुख्य वनसंरक्षक रामाराव, रोजगार हमी योजनेचे कार्यालयीन अधीक्षक बाबासाहेब जेजूरकर, उपायुक्त डाॅ. अर्जुन चिखले, विकास योजनेचे उपायुक्त मित्रगोत्री, सागर शिंदे उपस्थित होते. 


बोगस मसगीला चाप 
भात क्षेत्र असलेल्या तालुक्यामध्ये जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून स्थानिक तालुका कृषी अधिकारी आणि उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडून मसगी आणि दगडीबांध कामांना महत्त्व देण्यात येत होते. मात्र, मसगी आणि दगडीबांध कामांमध्ये आर्थिक गोंधळ होत असून, पूर्ण अभ्यास असल्याने विभागीय आयुक्त झगडे यांनी बोगस मसगीच्या कामांना चाप लावला आहे.

बातम्या आणखी आहेत...