आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहपाठ न केल्याने विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिकेची बेदम मारहाण; नाशिकची घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गृहपाठ पूर्ण नसल्याने अाणि अक्षर खराब असल्याने शिक्षा म्हणून विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिकेने जबर मारहाण केल्याचा प्रकार जेलराेड परिसरातील एमराल्ड हाइट्स पब्लिक स्कूल या शाळेत मंगळवारी (दि. ६) घडला. विद्यार्थ्यांनी हा प्रकार सांगितल्यानंतर पालकांनी थेट नाशिकरोड पोलिस ठाणे गाठून या मुख्याध्यापिकेविराेधात तक्रार दाखल केल्याने पाेलिसांनी मुख्याध्यापिका जयश्री रोडे यांना ताब्यात घेतले अाहे.

 

पालक आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकरोड परिसरातील जेलरोड भागामध्ये सैलानी बाबा चौकातील तिरुपती एज्युकेशन अॅन्ड चारिटेबल ट्रस्टचे एमराल्ड हाइट्स पब्लिक स्कूल आहे. मंगळवारी वर्गात शिक्षक आल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या अभ्यासाबाबत चौकशी केली. यात काही विद्यार्थ्यांचा गृहपाठ अपूर्ण होता तर काही विद्यार्थ्यांचे अक्षर खराब होते. याबाबत मुख्याध्यापिका जयश्री रोडे यांनी तिसरी ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षा म्हणून त्यांच्या पायाच्या पोटऱ्यांवर छडीने मार दिला. मार एवढा जबरदस्त होता की शिक्षा दिल्यानंतर चार तासांनीही या मारहाणीचे निशाण कायम हाेते.

 

इतर पालकांच्या मनात भिती
ज्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिकेने शिक्षा केली. त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी पोलिस ठाण्यात मुख्याध्यापिकेविरोधात तक्रार केल्याने शाळेवर कारवाई केली जाईल. तसेच शाळा बंद पडली तर इतर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काय? असे प्रश्न पडल्याने त्या पालकांच्या मनात भिती निर्माण झाली होती.

 

शिक्षेनंतरच्या वैफल्याचे रुपांतर मनाेविकारात शक
शिक्षकांनी वर्गात सर्वांसमाेर अपमान करणे किंवा मारणे ही बाब बालकाच्या अायुष्यावर दीर्घकाळासाठी परिणाम करते. कालांतराने शिक्षक विद्यार्थ्यापासून दूर जातात, परंतु त्यांनी दिलेली शिक्षा त्याला सदैव स्मरणात राहते. बऱ्याचदा शिक्षा दिल्यानंतर बालकांचा अात्मविश्वास अाणि अात्मसन्मान कमी हाेताे. त्याचा थेट परिणाम मानसिक जडणघडणीवर तसेच त्याच्या अभ्यासावर हाेताे. शाळेत मिळालेल्या शिक्षेनंतर अालेल्या वैफल्याचे रुपांतर मानसिक अाजारात हाेत असल्याचे अनेक उदाहरणे अामच्यासमाेर अाहेत. कृत्य करताना चार वेळा विचार करावा.
- अमाेल कुलकर्णी, मानसविकास तज्ज्ञ

 

'बिटको'मध्ये पुन्हा डाॅक्टरांचा हलगर्जीपणा
चांदगिरी येथील चार वर्षाच्या शालिनीच्या गळ्यामध्ये दहा रुपयाचे नाणे अडकळ्यानंतर बिटको तिला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, नेहमीप्रमाणे बिटको रुग्णालयातील डाॅक्टर रविवार असल्याने सुट्टीवर होते. बिटको रुग्णालयात नाशिकरोड, शिंदे, पळसे, देवळालीगाव, भगूर, देवळाली कॅम्प, विहितगाव, वडनेर दुमाला, एकलहरा, नानेगाव, सामनगाव, जेलरोड, उपनगर या परिसरातील रुग्ण उपचारासाठी येतात. रविवारी डाॅक्टरांना त्वरीत बोलावून घेतले असते तर शालिनी हांडगेचा जीव वाचला असता. त्याचप्रमाणे मंगळवारीही एमरल्ड हाइटस शाळेतील मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित डाॅक्टर उडवाउडवीचे उत्तरे देत होते. तर निवासी वैद्यकिय अधिकारी जंयत फुलकर यांना तर रुग्णांबाबत देणेघेणे नसल्यासारखे त्यांच्या बोलण्यावरुन दिसून आले. फुलकरांविराेधात प्रभाग बैठकीतही नगरसेवकांनी त्यांना सुनावले. आता रुग्णासाठी लोकप्रतिनिधींनी रस्त्यावर उतरण्याची गरज असल्याचे रुग्ण आणि त्यांच्या नातलगांची चर्चा सुरू होती.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो, माहिती आणि व्हिडीओ

बातम्या आणखी आहेत...