आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फ्लॅट नावावर करण्याचे आमिष दाखवले, मालकांनी चार वर्ष केला विवाहितेवर आत्याचार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- फ्लॅट नावावर करण्याचे आमिष दाखवत विवाहितेवर चार वर्षांपासून दोघांनी अनेक वेळा आत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2014 मध्ये पीडिता एका सोसायटीमध्ये भाडेकरारावर राहत होती. सोसायटीच्या सात मलकांपैकी संशयित बाबूराव पाळदे आणि विश्वास भोर यांनी पीडितेला फ्लॅट नावावर करून देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर चार वर्षे आत्याचार केला. तसेच, पती आणि मुलांना धमकी देऊन बदनामी करू, असा दम दिला. या प्रकाराची गंभीर दखल घेत संशियितांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...