आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडकोतील ५०० घरांवर 'रेड मार्किंग'; पथकाला घेराव, वादावादीमुळे तणाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको- 'वॉक विथ कमिशनर' उपक्रमात पालिका आयुक्तांनी अतिक्रमणांविरोधात कठोर भूमिका स्पष्ट केल्यानंतर, पालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक कार्यप्रवण झाले असून सिडकोतील अतिक्रमित सुमारे ५०० घरांवर मंगळवारी (दि. २२) लाल खुणा (रेड मार्किंग) करण्यात अाल्या. या प्रकाराने धास्तावलेल्या नागरिकांनी अतिक्रमण निर्मूलन पथकाला विरोध करत अधिकाऱ्यांना घेराव घातल्याने परिसरात गाेंधळ निर्माण हाेऊन काही काळ तणावाची स्थिती बनली हाेती. 


महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धसक्याने सिडको विभागाचे अतिक्रमण निर्मूलन पथक कारवाईसाठी सरसावले अाहे. चांगलेच कामाला लागले आहे. पथकाने मंगळवारपासून अशी अतिक्रमित बांधकामे लाल रंगाने चिन्हांकित करण्यास सुरुवात केली. या प्रकाराने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली. अनेक ठिकाणी नागरिकांनी अतिक्रमण निर्मूलन पथकाला विरोध करत अधिकाऱ्यांना घेराव घालत तीव्र विराेध दर्शविल्याने सिडकोत अतिक्रमणांचा विषय अधिकच पेटल्याचे चिन्ह आहेत.


अतिक्रमणाबाबत दोन गट 
अतिक्रमण निर्मूलनाबाबत सिडकोतील नागरिकांमध्ये दोन गट पडल्याचे दिसून येते. एक गट अतिक्रमण हटवाच, अशी विनंती थेट आयुक्तांना करत आहे, तर, दुसरा गट अतिक्रमणे हटवू नयेत, यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सिडकोतील नागरिक संभ्रमावस्थेत आहेत. दरम्यान, कायद्याचा गैरवापर केला जात असेल किंवा कोणी कायदा पाळत नसेल तर त्यांच्यावर कारवाई होणारच, अशी ठाम भूमिका पालिका अायुक्तांनी घेतली आहे. 
अतिक्रमित घरांवर पालिकेच्या पथकाने अशी लाल खूण केली. 


मुख्यमंत्र्यांना पत्रे लिहिणार 
स्वत:ला सर्वज्ञ व सर्वेसर्वा समजत कायदा व शिस्तीच्या नावाखाली नाशिकमधील सिडकोच्या सहा क्रमांकाच्या योजनेतील २४ हजार ५०० घरे नियमबाह्य ठरविणारे व रोज नवनवे फतवे काढून जनतेत भीती पसरविणारे नाशिक महापालिकेचे अायुक्त तुकाराम मुंढे यांना आवरा, जनजीवन उद्ध्वस्त करू नका अशा अाशयाचे पत्र सिडकाेवासीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाेस्टकार्डद्वारे पाठवावे, असे अावाहन काही नेते करत अाहेत. त्यामुळे या अतिक्रमण मोहिमेला तीव्र धार चढत अाहे. 

बातम्या आणखी आहेत...