आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यालयात देवी-देवतांची छायाचित्रे लावू नयेत; तुकाराम मुढेंनी दिल्या अधिकाऱ्यांना सूचना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दुसऱ्या दिवशी शासन निर्णयाचा आधार घेत, महापालिकेच्या कार्यालयात देवी-देवतांची छायाचित्रे लावू नयेत असे सांगत त्या हटविण्याच्या सूचना दिल्या आहेेत. त्यानंतर आयुक्त कार्यालयासह विभागप्रमुखांच्या कार्यालयातीलही देवी-देवतांच्या तसबिरी हटवण्यात आल्या. यावरून नवा वाद ओढावण्याची शक्यता आहे. मुंढे यांनी अधिकाऱ्यांना माध्यमांपासून लांब राहण्याचा सल्ला दिला असून, कोणत्याही अधिकाऱ्याने परस्पर मीडियाशी बोलू नये असे फर्मान काढले आहे. 

 

 

महापालिकेत देवी-देवता हद्दपार झाल्याने हिंदूत्ववादी संघटनांकडून याबद्दल आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे. मुंढे यांच्या अल्टिमेटमनुसार महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुटीचे दोन दिवस राब राब राबून महापालिका कार्यालयाची स्वच्छता केली. त्यानंतर मुंढेंनी या अधिकाऱ्यांना आपल्या कार्यालयासह विविध कार्यालयांत लावलेल्या देवी-देवतांच्या तसबिरी काढण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार आयुक्तांच्या स्वीय सहाय्यक कार्यालयात असलेला दत्ताचा फोटोही हटविण्यात आला आहे. त्यासोबत शहर अभियंता, अतिरिक्त आयुक्त व विभाग प्रमुखांच्या कार्यालयात असलेले देवी देवतांचे फोटो काढून टाकण्यात आले आहेत. आयुक्तांच्याच सूचना असल्याने अधिकाऱ्यांनी त्याची तातडीने अंमलबजावणी केली आहे. पालिकेच्या भिंतींवर आता महापुरुषांचेच फोटो राहणार आहेत. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...