आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यावसायिक नाट्य स्पर्धेत नाशिकच्या कलाकारांना 'राजमान्यता'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिकमधून उभे राहिलेल्या 'संगीत देवबाभळी' या नाटकाने व्यावसायिक राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम पारिताेषिक पटकावले. विशेष म्हणजे या नाटकाने लेखक, दिग्दर्शन, अभिनय, संगीत अाणि प्रकाशयाेजना या विभागात प्रथम पारिताेषिके पटकावल्याने एक प्रकारे नाटकासह नाशिकच्या कलाकारांवर राजमान्यतेची मुद्राच उमटली आहे. 


महाराष्ट्र राज्य मराठी व्यवासायिक स्पर्धेचा निकाल जाहीर झाला अाणि नाशिकच्या कलाकारांनी या स्पर्धेवर अापले वर्चस्व सिद्ध केले. मालिकांमधून अनेक कलाकार नाशिकचे नाव उंचावत अाहेतच पण, अाता नाटकातूनही नाशिकचे नाव गगनाला भिडत अाहे. सध्या काेणतीही नाट्य स्पर्धा असाे ती पारिताेषिके मिळतात ती नाशिकच्याच कलाकारांना. व्यावसायिक राज्य नाट्य स्पर्धेतही अनेक दिग्गजांना मागे टाकत देवबाभळी नाटकासाठी लेखनाचे प्रथम तर दिग्दर्शनाचे द्वितीय पारिताेषिक नाशिकच्या प्राजक्त देशमुखला जाहीर झाले. एवढेच नाही तर याच नाटकासाठी संगीतकार अानंद अाेक प्रथम पारिताेषिक, प्रकाशयाेजना प्रफुल्ल दीक्षीत प्रथम, अभिनय राैप्यपदक शुभांगी सदावर्ते यांना पारिताेषिके जाहीर झाली अाहेत. तर स्पर्धेत द्वितीय अालेल्या नाटकातील नाशिकचा कलाकार सिद्धार्थ बाेडके यालाही अभिनयाचे राैप्य पारिताेषिक जाहीर झाल्यानेे यंदाच्या स्पर्धेवर नाशिकचा झेंडा फडकू लागला. 


तुकाराम-विठ्ठलाची कृपा 
या पुरस्कारामुळे मी गमतीने म्हणेल की, अाता राजमान्यताही मिळाली. रसिकांनी गाैरविल्यानंतर शासनानेही नाटकाचा अाणि पर्यायाने कलाकारांचा हा जाे गाैरव केला अाहे, ताे जबाबदारी वाढविणारा अाहे. या यशात भद्रकाली प्राॅडक्शनच्या प्रसाद कांबळींचा माेठा वाटा अाहे. त्यांनी एकांकिकेतील सत्व अाेळखलं नसतं तर अाज अाम्ही या टप्प्यावर अालाेच नसताे. ही सगळी तुकाराम, विठ्ठलाची कृपा अाहे असे मी मानताे. अाता रसिकांच्याही अपेक्षा वाढल्या अाहेत. पण घाई न करता थाेडं थांबून उत्तमातील उत्तम देण्याचा यापुढील माझा प्रयत्न अाहे. शेवटी पुरस्कार मिळाल्याचा अानंद अाहेच. - प्राजक्त देशमुख, लेखक, दिग्दर्शक- नाटक, संगीत देवबाभळी 

बातम्या आणखी आहेत...