आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात पुतळे परिसरात पाेलिस बंदाेबस्तात वाढ, समाजकंटकांवर ठेवली जातेय नजर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - देशभरात पुतळ्यांची तोडफोड करण्याचे सत्र सुरू असून औरंगाबादमध्येही पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याने हे लोण राज्यभरात पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही बाब लक्षात घेत पोलिस महासंचालकांनी सतर्कतेचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांकडून बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पुतळे परिसरात गोपनीय बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. गुड मॉर्निंग पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.

 

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पोलिस आयुक्तालयातील १३ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत असलेल्या पुतळ्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचे आदेश दिले आहे. विशेष शाखेकडून समाजकंटकांसह अशाप्रकारचे गुन्हे दाखल असलेले नेते, पदाधिकाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. शहरात १३० पुतळे आहेत. त्यातील अधिकृत ४७ पुतळे, तर ८३ पुतळे विविध सामाजिक संघटना, संस्थांनी बसवले अाहेत. यातील अधिकृत ४७ पुतळ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी महापालिकेची आहे. पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलिस बंदोबस्तात वाढ केली आहे. शहरातील १३ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गुड मॉर्निंग पथकाकडून रात्री १२ ते पहाटे ६ वाजेपर्यंत गस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...