आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफी रक्कम खात्यात वळती होताच शेतकऱ्यांना एसएमएस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- कर्जमाफीची रक्कम ज्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात वळती हाेत अाहे त्यांना माेबाइलवर एसएमएस मिळू लागले अाहेत. अतिशय किचकट प्रक्रियेतून गेलेल्या अाणि प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अचानक अापल्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याचा एसएमएस माेबाइलवर चमकल्याने अनेकांना सुखद धक्का मिळत अाहे. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी जिल्हा बँकेचे खातेदार असून, बँकेने एसएमएस पाठविण्यासाठी एका व्हेंडरची नेमणूक केल्याने हे एसएमएस संबंधितांना मिळायला सुरुवात झाली अाहे. 


साेमवारपासून विधिमंडळाचे हिवाळी सत्र सुरू झाले असून, विराेधकांकडून कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला घेरण्याला सुरुवात झाली अाहे. यामुळे सरकारने कर्जमाफीची प्रदीर्घ चाललेली प्रक्रियादेखील गांभीर्याने घेतली असून, साेमवारी याचसंदर्भाने मुख्यमंत्री कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहकार विभाग, बँकांचे अधिकारी यांची एक व्हिडिअाे काॅन्फरन्स घेतली, त्यात कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे अवगत करण्यावर भर दिला गेला. त्यानंतर लागलीच नाशिक जिल्हा बँकेने एका व्हेंडरला हे काम दिले. 


मात्र शेतकऱ्याचे कर्जखाते विविध कार्यकारी सेवा संस्थांकडे असल्याने त्यांचे माेबाइल क्रमांक मिळविण्यास अडचणी हाेत्या, त्यावर मात करीत कर्जमाफीसाठी भरलेले अर्ज अाणि बँकेकडे उपलब्ध असलेली माहिती यांचा ताळमेळ बसवत ज्यांचे जे माेबाइल क्रमांक या सगळ्या प्रक्रियेत वापरले गेलेले अाहेत, त्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झाल्याचे एसएमएस पाठवायला सुरुवात झाली अाहे. 


२- हजारांचे व्यवहार शाखा पातळीवर सुरू 
बँकेच्याजवळपास सर्वच शाखांतून २- हजार रुपये प्रति अाठवडा एका ग्राहकाला मिळतील अशाप्रकारे व्यवहार सुरू झालेले अाहेत. त्यामुळे प्रधान कार्यालयात अारटीजीएससाठी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी कमी हाेत अाहे. स्थानिक शाखांतूनच सध्या काही प्रमाणात रक्कम मिळू लागली असून लवकरच ही स्थिती अाणखी सुधारणार असल्याची माहिती बँकेच्या सूत्रांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...