आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाखाती देशात नोकरीचे अामिष, युवतींचे लैंगिक शोषण, 15 लाखांना गंडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- आखाती देशात नोकरीचे आमिष देत युवतींचे लैंगिक शोषण करत तब्बल १५ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार जय भवानीरोड येथे उघडकीस आला. या प्रकारामुळे शहरात कबुतरबाज रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली जात आहे. 


याप्रकरणी पीडित युवतीच्या अाईने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, जानेवारी २०१० ते २०१६ या कालावधीत दया संकुल, जयभवानीरोड येथे संशयित सुनिल जांगेड, पवन जांगेड, रामगोपाल जांगेड यांनी पीडित महिलेला कमी किंमतीत प्लॉट घेऊन देतो असे सांगत तिच्याकडून १५ लाख रुपये घेतले. या पीडित महिलेच्या मुलीस संशयित पवनने अाखाती देशात नोकरीचे आमिष दाखवत तिचे आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो काढले. पैशांची मागणी केली असता संशयिताने या मुलीस ब्लॅकमेल करण्याची धमकी दिली. पीडित महिलेने मुलीसह पोलिसांत धाव घेतली. घटनेचे गांभीर्य अोळखत पाेलिसांनी संशयितांच्या विरोधात उपनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला अाहे. 


माेठे रॅकेट येणार उघडकीस

संशयितांनी अनेक मुलींना अाखाती देशात नोकरी देण्याचे अामिष देत फसवणूक केल्याचा संशय आहे. पीडित महिला संशयितांची नातेवाईक आहे. तिलाही अशाच प्रकारे अामिष देत फसवणूक केल्याने यामागील मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...