आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
येवला- स्थानिक स्वराज्य संस्था नाशिक मतदारसंघाच्या जागेवर शिवसेनेने जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर केली आहे. शिवसेना सर्वाधिक १९१ मतांसह मोठा पक्ष अाहे. सेना-भाजप युती झाल्यास दराडे यांना माेठी संधी असणार अाहे.
दराडे यांना 'मातोश्री'हून यापूर्वीच या जागेसाठी कामाला लागण्याचे संकेत देण्यात आले होते. मध्यंतरी मागील निवडणुकीत चिठ्ठीद्वारे थाेडक्यात पराभवाला सामोरे जावे लागलेले शिवसेनेचे उमेदवार अॅड. शिवाजी सहाणे यांनीदेखील उमेदवारीचा जोरदार आग्रह धरला होता. मात्र, याचदरम्यान त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यावेळीच दराडेंच्या उमेदवारीचे संकेत मिळाले होते. येवल्याच्या राजकारणात 1995 पासून दराडे आमदारकीचे स्वप्न पाहत होते. 1999च्या विधानसभा निवडणूकीत विजयासमीप पोहोचल्यानंतर झालेल्या गोंधळात अवघ्या दोनशे एकवीस मतांनी त्यांना परावभव स्विकारावा लागला होता. 2004 मध्ये हेवीवेट नेते छगन भुजबळांनी तेथून उमेदवारी केली आणि तेव्हापासून पुढच्या तीनही विधनसभा निवडणुकीत दराडेंच्या हिरमोड झाला. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.