आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक मतदार संघासाठी शिक्षक सेनाही रिंगणात, इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी असलेल्या लोकप्रतिनिधीची ७ जुलै २०१८ रोजी मुदत संपत आली आहे. त्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीसाठी इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असून यामध्ये शिक्षण संस्थाचालक आहे तर काही शिक्षक आहे. मात्र, मतदार राजा असलेला शिक्षक कोणाला पसंती देतो हे लवकरच समजणार आहे. आतापर्यंत चर्चेत नसलेल्या शिक्षक सेनेनेही नाशिक विभागातून उमेदवार देण्यासाठी पाच जिल्ह्यातून चाचपणीला वेग दिला आहे. त्यामुळे निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे आहे. 


केंद्रीय निवडणूक आयोगाने ८ जून रोजी मतदानाची तारीख घोषित देखील केली होती. मात्र, उन्हाळी सुटी असल्याने मतदानात घसरण होईल, म्हणून काही इच्छुकांनी राज्य निवडणूक आयोगाला विनंती केली. त्यानुसार निवडणूक आयोगाने ही विनंती मान्य करून मतदान पुढे ढकलले आहे. या मिळालेल्या वेळेची संधी करण्यासाठी इच्छुकांनी पुन्हा पायाला भिंगरी लावली आहे. त्यामुळे आता नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यात शिक्षक मतदारांची वैयक्तिक गाठीभेटी घेण्यास जाेमाने सुरुवात केली आहे. याचबराेबर सोशल मीडियाचा वापरही या निवडणुकीत माेठ्या प्रमाणात वाढला अाहे. शिक्षक मतदार संघासाठी नाशिक विभागातून भाऊसाहेब कचरे, शालिग्राम भिरुड, संदीप बेडसे, आप्पासाहेब शिंदे, सुनिल पंडित,अनिकेत पाटील यांच्यासह अनेकांंनी तयारी केली आहे. 


शिक्षक सेनेचेही गुडघ्याला बाशिंग 
टीडीएफ, शिक्षक परिषदेतील इच्छुकांनी निवडणुकीच्या प्रचाराला वेग घेतला असतानाच भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला. अद्यापपर्यंतही शिक्षक सेनेची भूमिका पुढे दिसून येत नव्हती. परंतु दोन दिवसापूर्वी मुंबई शिक्षक मतदार संघातून सेनेने आपला उमेदवार घोषित केल्यानंतर नाशिक शिक्षक मतदार संघासाठीही उमेदवार शनिवारपर्यंत घोषित केला जाणार आहे. त्यासाठी शिक्षक सेनेचे संजय चव्हाण यांनी नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यातून चाचपणी करून उद्धव ठाकरे यांना अहवाल पाठविण्याच्या हालचाली सुरू आहे. त्यामुळे निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. 

बातम्या आणखी आहेत...