Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | Shivsena candidate Kishore Darade filed nomination

शिवसेना पुरस्कृत किशाेर दराडे यांचा अर्ज दाखल

प्रतिनिधी | Update - Jun 07, 2018, 08:52 AM IST

शिक्षकांसह विद्यार्थ्यांचे यांचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी नाशिक विभाग शिक्षक मतदा

  • Shivsena candidate Kishore Darade filed nomination

    नाशिकरोड- शिक्षकांसह विद्यार्थ्यांचे यांचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे टीडीएफ-शिवसेना पुरस्कृत उमेदवार किशोर दराडे यांना विजयी करण्याची आवाहन राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले.


    नाशिकरोड येथे बुधवारी शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेने पुरस्कृत केलेले किशोर दराडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी येथील कदम लॉन्समध्ये शिक्षकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी दादा भुसे म्हणाले, शिक्षक मतदारसंघातून शिक्षण क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्त्व म्हणून दराडे यांना शिक्षकांच्या प्रश्नांची त्यांचा अचूक जाण आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दराडे यांना पाठिंबा दिला असून, त्यांच्या विजयासाठी आम्ही जीवाचे रान करून त्यांना निवडून आणण्याचे आवाहन यावेळी उपस्थित शिक्षक आणि शिवसैनिकांना केले. यावेळी शिवसेना उपनेते बबनराव घोलप म्हणाले, पक्षप्रमुखांनी आम्हाला ही निवडणूक जिंकण्याचे आदेश दिले आहेत. दराडे यांच्या पाठीशी सर्व शक्ती पणाला लावावी लागणार आहे. यावेळी किशोर दराडे, संजय चव्हाण, जे. पी. पाटील यांनीही भाषण केले. व्यासपीठावर आमदार नरेंद्र दराडे, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सचिन मराठे, सत्यभामा गाडेकर, दत्ता गायकवाड, अजय बोरस्ते, विलास शिंदे, सुधाकर बडगुजर उपस्थित होते. मेळाव्यानंतर दराडे यांनी विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात अर्ज दाखल केला.

Trending