आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधानपरिषदेसाठी शिवसेनेची अाज बैठक; उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख राऊत करणार मार्गदर्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- विधानपरिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर माेर्चेबांधणीला वेग अाला असून, शिवसेनेने अापला उमेदवारही जाहीर केला अाहे. अंतर्गत गटबाजी राेखून पक्षाने एकदिलाने काम करण्याच्या उद्देशाने बुधवारी (दि. २५) सकाळी १० वाजता उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेने नगरसेवक अाणि पदाधिकाऱ्यांची बैठक बाेलाविली अाहे. या बैठकीला विधानपरिषदेच्या मतदारांची किती उपस्थिती लाभते हे बघणे अाता अाैत्सुक्याचे ठरणार अाहे. 


विधानपरिषदेचे विद्यमान अामदार जयवंत जाधव यांचा कालावधी जूनअखेर संपुष्टात येत अाहे. त्यामुळे निवडणूक अायाेगाने या रिक्त हाेणाऱ्या जागेसाठी निवडणूक कार्यक्रम घाेषित केला अाहे. २१ मे राेजी मतदान असून २४ मे राेजी मतमाेजणी हाेणार अाहे. या पार्श्वभूमीवर एेन निवडणुकीत दगाफटका नकाे अाणि पक्षीय एेक्य वाढावे या दृष्टीने उत्तर महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख संजय राऊत बुधवारी नाशकात येत असून, त्यांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता शिवसेनेच्या कार्यालयात बैठक हाेणार अाहे. या बैठकीला नवनियुक्त संपर्कप्रमुख भाऊसाहेब चाैधरीदेखील उपस्थित असतील. या बैठकीला शिवसेनेचे २०७ मतदार येणे अपेक्षित अाहे. बैठकीचे निमंत्रण पक्षातील कार्यकर्त्यांनाही देण्यात अाले असून, प्रत्यक्षात बैठकीला मतदार असतात की कार्यकर्ते याबाबत उत्सुकता अाहे. 


पदाधिकाऱ्यांचा हाेणार सत्कार 
संपर्कप्रमुख भाऊसाहेब चाैधरी यांच्या नियुक्तीबराेबरच शिवसेनेने महिलांची फळीही भक्कम करण्यासाठी ५४ महिला पदाधिकाऱ्यांची टीम जाहीर केली. या महिला पदाधिकाऱ्यांचा विशेष सत्कार बुधवारी हाेणाऱ्या बैठकीत करण्यात येणार अाहे. यात श्यामला दीक्षित, वैशाली राठोड, ज्योती देवरे, अश्विनी रेडेकर, अनिता पाटील, श्रद्धा जोशी, रेणुका वंजारी, मेघा प्रधान, उज्ज्वला वाणी, स्वाती पाटील, अलका गायकवाड, सीमा बडदे, उषा गायके, सुरेखा लोळगे, गुड्डी रंगरेज, कीर्ती खेडकर, मनीषा लासुरे, मधुबाला भाेरे, योगिता अहिरे, शीला कुलकर्णी, संजीवनी वराडे, लीलावती भवर, अलका गोपाळे, शोभा पवार यांच्यासह जिल्हाभरातील अनेक महिला पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार अाहे. या बैठकीकडे जिल्हाभरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले अाहे. 


संख्याबळामुळे वरचड 
यंदाच्या निवडणुकीत मतदारांचे संख्याबळ सर्वाधिक असलेल्या शिवसेना अाणि दुसऱ्या क्रमांकाच्या भाजपकडे सर्वांचेच लक्ष अाहे. विधानपरिषदेसाठी शिवसेनेचे संख्याबळ अाता २०७ इतके झाले अाहे. भाजपचे संख्याबळ अाता १६७ पर्यंत पाेहाेचले अाहे. काँग्रेस अाणि राष्ट्रवादीचे अनुक्रमे ७१ अाणि १०० असे संख्याबळ अाहे. माकप व मनसेसह अन्य ९८ सदस्य अाहेत. शिवसेना-भाजप युती झाल्यास निवडणुकीचे चित्र सहजपणे स्पष्ट हाेईल. मात्र, सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अलिकडेच युती न करण्याची स्पष्टाेक्ती केल्याने भाजपनेही उमेदवाराचा शाेध सुरू केला अाहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मात्र यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेण्यात येणार असल्याचे नुकतेच जाहीर केले. दुसरीकडे शिवसेनेने भाजपच्या निमंत्रणाची वाट न बघता नरेंद्र दराडे यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे पक्षातील काही मंडळी नाराज असल्याची चर्चा अाहे

बातम्या आणखी आहेत...