आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक-धुळे मार्गावर अाता लवकरच धावणार शिवशाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- अत्याधुनिक संपूर्ण वातानुकूलित असलेली शिवशाही बसेसला नाशिक विभागातून प्रवाशांच्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळेच विभागातून आता नाशिक-धुळे बायपास बंद करून या मार्गावर शिवशाही बसेस लवकरच धावणार अाहे. 


खासगी वाहतूकदारांसोबत स्पर्धा करताना राज्य परिवहन महामंडळाचे अधिकाधिक उत्पन्न तसेच प्रवासी वाढावे यासाठी प्रयत्न केले जात आहे. याचसाठी एसटीद्वारे माफक दरात संपूर्ण वातानुकूलित असलेल्या शिवशाही बसेसचे जोरदार ब्रँडिंगदेखील केले जात आहे. नाशिक-पुणे नाशिक-बोरिवली मार्गावर सुरू केलेल्या शिवशाही बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मार्गावरील सर्वच बसेसची बुकिंग फुल्ल होत आहे. याच पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाकडून आता नाशिक-धुळे मार्गावर शिवशाही बसेस सुरू केली जाणार आहे. या मार्गावर धावणाऱ्या नाशिक-धुळे बायपास बंद करून शिवशाही धावणार आहे. या मार्गावर धावणाऱ्या या शिवशाही बसेसचे भाडे २६६ रुपये अाहे, अशी माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 


सर्वसामान्य प्रवाशांना बसणार मात्र फटका
नाशिक-धुळेमार्गावर सद्यस्थितीला धावणाऱ्या नाशिक-धुळे बायपास बसचे १७५ रुपये भाडे आहे. मात्र, या मार्गावर आता धावणाऱ्या शिवशाही बसेसला २६६ रुपये भाडे अाकारले जाणार आहे. याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसणार अाहे. 

बातम्या आणखी आहेत...