आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार संजय राऊत यांनी दिले स्वबळावर निवडणुकीचे संकेत; जिंकले तरच मालेगावात पाय ठेवणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव- एक वर्षानंतर या सरकारचे काही खरे नाही, असे वक्तव्य भाजप नेते गिरीश बापट यांनी केले. मात्र, शिवसेनेचे बजेट वर्षाच्या अातीलच अाहे. महाराष्ट्रात कधीही निवडणुका हाेऊ दे, मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच हाेणार. अागामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे दीडशे अामदार जिंकून अाले तरच मालेगावात पाय ठेवू, असे वक्तव्य करत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधत स्वबळाचे संकेत दिले. 


शहरातील एेश्वर्या मंगल कार्यालयात बुधवारी शिवसेना पदाधिकारी लाेकप्रतिनिधींचा मेळावा अायाेजित करण्यात अाला हाेता. यावेळी राऊत बाेलत हाेते. राजकारणाच्या गरजा बदलल्याने फसवाफसवी करून विराेधक निवडणूक लढवत अाहे. सध्या विकास दिसत नसल्याने हतबल झालेले विराेधक जातीयवाद पसरवून राज्याला अशांत करण्याचे प्रयत्न करत अाहे. जनतेला एकदाच फसविता येते. या निवडणुकीत जनता तुम्हाला फसवेल. अपयशी ठरलेला गुजरात फॅक्टर महाराष्ट्रात चालणार नाही. राज्याच्या राजकारणात अाता परिवर्तन निश्चित अाहे. विकासकामांना प्राधान्य देणारी शिवसेना वाढत अाहे. 


उत्तर महाराष्ट्र काबीज केला तर महाराष्ट्र जिंकले म्हणून समजा. त्यामुळे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कामास लागावे, असे अावाहनही त्यांनी केले. पूर्वी शिवसेनेसाठी मालेगाव हे बहिष्कृत शहर समजले जात हाेते. राज्यमंत्री भुसेंच्या झंझावताने मालेगाव शिवसेनेचा बालेकिल्ला झाला अाहे. शिवसेनेला विधानसभेची चिंता नाही, चिंता लाेकसभेची. भुसेंनी केलेला विकास पाहता जनता त्यांना थेट दिल्लीत पाठवेल, असे सांगत राऊत यांनी मालेगाव-धुळे लाेकसभा मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार उभा करण्याचे सूताेवाचही केले. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, संपर्कप्रमुख सुहास सामंत, जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांनी मनाेगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवसेना विकासकामे दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात अाले. व्यासपीठावर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे, माजी जिल्हाप्रमुख अल्ताफ खान, रवींद्र चाैधरी, श्रीकांत पाटील, मधुकर हिरे उपस्थित हाेते. सूत्रसंचालन संजय दुसाने यांनी तर प्रास्ताविक रामभाऊ मिस्तरी यांनी केले. कार्यक्रमास बंडूकाका बच्छाव, भिकन शेळके, मनाेहर बच्छाव, जिजाबाई बच्छाव, संगीता चव्हाण उपस्थित हाेते. 


विराेधकांनाे, अाता फक्त चार महिने थांबा 
मालेगाव बाह्य मतदारसंघात शिवसेनेने कामे केली अाहेत, पब्लिसिटी नाही. विराेधक श्रेय लाटण्यासाठी शिवसेनेच्या कामांवर डल्ला मारत अाहे. गेल्या अाठवड्यात जि.प.च्या एका गटात विकासकामांचा शुभारंभ झाला. यातील कामे शिवसेनेच्या काळातील अाहे. पुढील चार महिने विकासकामांसाठी थांबलाे अाहे. त्यानंतर तुमचा समाचार घेताे, असा इशारा भुसे यांनी भाजप नेत्यांना दिला. 


पंतप्रधान नरेंद्र माेदींची फसवेगिरी उघड 
चहा विकणारा देशाचा पंतप्रधान झाल्याचे भावनिक अाव्हान भाजपकडून केले जाते. पंतप्रधान माेदीही चहा विकल्याचे सांगतात. मात्र, माेदींचा जन्म १९५० मध्ये गुजरातच्या वडगामला झाला. १९७३ साली या गावात रेल्वे अाली. माेदींनी देशसेवेसाठी २० व्या वर्षी गाव साेडले. मग कुठल्या फलाटावर चहा विकला. नेते कार्यकर्ते थापाडे असल्याने त्यांना या निवडणुकीत चहा विकायला पाठवा, असे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले. 


गुजरात निवडणुकीत काँग्रेसचाच विजय 
गुजरात निवडणुकीत माेदींच्या मतदारसंघात भाजप उमेदवाराचा ३५ हजार मतांनी पराभव झाला. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांची फाैज प्रचारात उतरविली. तरीही जनतेने भाजपला शंभरीत राेखले. काँग्रेसचे कमी अामदार निवडून अाले तरी खऱ्या अर्थाने विजय काँग्रेसचा झाल्याचे सांगत राऊत यांनी राज्यातील भाजप नेत्यांनी काहीतरी शिकावे, असा चिमटा काढला. 

बातम्या आणखी आहेत...