आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंढेपाठाेपाठ महापालिकेत 'टिम' भाजपच्या खांदेपालटाच्या हालचाली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - स्पष्ट बहुमताद्वारे सत्तेत अालेल्या भारतीय जनता पक्षाला वर्षभरातच नानाविध गैरप्रकारांच्या अाराेपाचे लागलेले ग्रहण, दत्तक नाशिकचा शब्द फाेल ठरण्याची भिती यापार्श्वभुमीवर महापालिका अायुक्तपदी बहुचर्चित तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या धक्क्यातून पदाधिकारी सावरत नाहीत ताेच, भाजपचा पारदर्शक कारभाराचा अजेंडा राबवणारा, विराेधकांना पुरेपूर उत्तर देणारी नवीन टिमच नियुक्तीच्या हालचाली सुरू झाल्याचे वृत्त अाहे. 


भाजप पदाधिकाऱ्यांचा महापालिकेत सव्वा वर्षाचाच कार्यकाळ विचाराधीन असताना त्यादृष्टीने विद्यमान पदाधिकाऱ्यांना वर्षभराचा पूर्ण झालेला कालावधी व त्यात समाधानकारक कामकाज नसल्याची बाब लक्षात घेत या चर्चेत राजकीय रंगही भरणे सुरू झाले अाहे. विशेष म्हणजे, याची कुणकुण लागल्यामुळे भाजपचे पदाधिकारीही चार ते पाच दिवसांपासून अस्वस्थ असून त्यातून पक्ष कार्यालयातील पं. दीनदयाळ उपाध्याय स्मृतीदिन साेहळा असाे की, महापाैर चषकाचा समाराेप साेहळा किंबहुना महापालिका कार्यालयातील उपस्थिती या सगळ्यांवरच संबंधितांनी अघाेषीत बहिष्कारच टाकल्याची चर्चा भाजपच्याच अंतर्गत वर्तुळात अाहे. 


महापालिकेच्या इतिहासात ६६ नगरसेवक निवडून स्पष्ट बहुमताद्वारे सत्ता मिळवणारा पहिलाच पक्ष म्हणून भाजपला मान मिळाला अाहे. अर्थातच त्याचे बहुतांश श्रेय मुख्यमंत्र्यांना दिले जात असून महापालिका निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी नाशिक दत्तक घेण्याच्या घाेषणेला दिलेला प्रतिसादच मानला जात अाहे. मात्र सत्तेत अाल्यानंतर गतवर्षभरात भाजपकडून मुख्यमंत्र्यांच्या पारदर्शक कारभाराच्यादृष्टीने प्रतिमा जपण्यासाठी प्रयत्न झाले नाही. जादा विषयात काेट्यवधीचे प्रस्ताव मंजूर केल्यामुळे पक्षाची पुरती बदनामी झाली. मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे प्रकल्पही मार्गी लावण्याकडे भाजपचे दुर्लक्ष झाले. त्याएेवजी कधी महापाैर, सभागृहनेते वाद, कधी उपमहापाैर - महिला अामदार वाद, गटनेत्यांची छुपी धुसफूस अादी मुद्यावरून पक्षाला कायमच वादाचे ग्रहण राहीले. 


अशातच पक्षाला सत्ता मिळून वर्षपुर्तीची वेळ अाल्यानंतरही काहीच ठाेस उभे न राहील्यामुळे निराश मुख्यमंत्र्यांनी 'वर्षा' बंगल्यावर बाेलवून सर्वांना सुधारण्याची अखेरची संधी दिली हाेती मात्र या संधीचे साेने न करता अाल्यामुळे प्रथम अायुक्तपदी मुंढे यांची नियुक्ती करून पारदर्शक कारभाराच्यादृष्टीने महत्वाचा फेरबदल केला. अाता नियमानुसारच प्रस्ताव अाणणारे, अाराेप करणाऱ्या शिवसेनेला ताेडीस ताेड उत्तर देणाऱ्या पदाधिकाऱ्यांची नियुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांनी संकेत दिल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. त्यातूनच साेमवारी उत्तर महाराष्ट्राच्या पक्ष विस्ताराकांच्या बैठकीसाठी अालेल्या संघटनमंत्री किशाेर काळकर यांच्याकडून त्यादृष्टीने चाचपणी झाल्याचे सांगितले जाते मात्र त्यादृष्टीने अधिकृत नकार देण्यास वा बाेलण्यास भाजपकडून काेणीही तयार झाले नाही. भाजपाकडून महापाैर, उपमहापाैर, सभागृहनेता नियुक्तीच्या प्रक्रियेच्यावेळीच संबंधितांचा कार्यकाळ सव्वा वर्ष असेल असे जाहीर करण्यात अाले हाेते. सध्याच्या कारभाऱ्यांना फेब्रुवारीत एक वर्ष तर मे महिन्यात सव्वा वर्ष पूर्ण हाेणार असल्यामुळे फेरबदलाच्या चर्चला उधाण अाले अाहे. 


मूक निषेध की हतबलता ? 
शुक्रवारी मुंढे यांच्या नियुक्तीनंतर भाजपतील अामदारासह नगरसेवकांचा एक माेठा गट खुद्द मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविषयीच नाराज असल्याची चर्चा पसरली. मुंढे यांची कार्यपद्धती बघता उद्या नगरसेवकांचीच कामे रखडली तर भाजपला माेठा धक्का बसेल अशी भिती व्यक्त हाेत अाहे. तरतुद नसलेले व जादा विषयात मंजुर झालेले २५७ काेटी रूपयांचे रस्तेही रद्द हाेण्याची शक्यता लक्षात घेत महापाैरासह अन्य पदाधिकारी अस्वस्थ झाल्याचे वृत्त अाहे. त्यातून पक्ष कार्यालयातील पं. उपाध्याय स्मृतीदिन साेहळा, महापाैर चषक साेहळ्याच्या बक्षीस वितरणात प्रमुख उत्सवमुर्ती असलेल्या महापाैरांचीच अनुपस्थितीत, देवदर्शनानिमित्त बाहेर असलेले सभागृहनेते, नाशिकमध्ये येवूनही महापाैर चषकाकडे पाठ फिरवणारे पालकमंत्री अादींच्या अनुपस्थितीबाबत नानाविध तर्कवितर्क लढवले जात अाहे. मुंढे यांच्या नियुक्तीबाबत एकप्रकारे हा मुक निषेध अाहे की, हतबलतेतून पालिकेच्या कामकाजाकडे पाठ फिरवली याचे उत्तर अाता रंजक ठरणार अाहे.

बातम्या आणखी आहेत...