आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनई हत्याकांड; आरोपींच्या महिला नातलगांवर पोलिस यंत्रणेचे होते खास लक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- राज्यातील बहुचर्चित सोनई हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर नातेवाइकांचे चेहरे भीतीने काळवंडले हाेते. महिलांच्या अाक्राेशामुळे न्यायालयाच्या आवारात तणाव निर्माण झाला होता. विशेषत: जिल्हा न्यायालयाच्या परिसरात आरोपींच्या नातेवाइकांकडून काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संपूर्ण परिसरात पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. निकालाच्या पूर्वसंध्येलाच हे सर्व नियाेजन पूर्ण केले जात हाेते. निकालाच्या दिवशी शनिवारी (दि. २०) सकाळी प्रत्येकाची कसून चौकशी व तपासणी झाल्यानंतरच काेर्टाच्या अावारात  प्रवेश दिला जात होता.


अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनई हत्याकांडाचा खटला  नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होता. त्याच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले होते. खटला दोन समाजांमध्ये जातीय तेढ निर्माण करणारा असल्याने त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून बंदोबस्ताचे चोख नियोजन करण्यात आले होते. निकालानंतर आरोपींच्या नातेवाइकांकडून विरोध होण्याची शक्यता लक्षात घेता यंत्रणा सतर्क झाली होती. सकाळी ९ वाजता न्यायालय परिसरात बीडीडीएस आणि श्वानपथकाने तपासणी केली. न्यायालयाच्या नवीन-जुन्या इमारतींच्या परिसरात उभ्या असलेल्या वाहनांची तपासणी करण्यात आली. या परिसरात येणाऱ्या प्रत्येकाला मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी केल्यानंतरच प्रवेश दिला जात होता.  उपआयुक्त विजय मगर, लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, निरीक्षक अशोक भगत यांच्यासह गुन्हे, विशेष शाखेचे अधिकारी व कर्मचारी, राज्य राखीव पोलिस काेर्टाच्या परिसरात तैनात होता.

 

१२ अधिकारी, ७५ पाेलिस कर्मचारी
निकालाच्या दिवशी पोलिसांनी जिल्हा न्यायालयात अतिरिक्त पोलिस बंदोबस्ताचे नियाेजन केले. त्यात १ उपआयुक्त, १ सहायक आयुक्त, ५ निरीक्षक, ५ महिला अधिकारी, ७५ महिला व  पुरुष कर्मचाऱ्यांचा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे काेर्ट अावाराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

 

महिला नातेवाईक ताब्यात
हत्याकांडातील आरोपींच्या नातेवाईक महिलांनी आत्मदहनाचा इशारा दिल्याने सर्वप्रथम सकाळी ९ नातेवाईक महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले हाेते. खटल्याचा निकाल लागेपर्यंत त्यांना निगराणीखाली ठेवण्यात अाले. निकाल जाहीर झाल्यानंतर काही वेळाने त्यांना साेडण्यात अाले.

 

खटल्याशी निगडितांनाच प्रवेश
जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अादेशान्वये खटल्याशी संबंधित असलेल्यांनाच प्रवेश दिला जात होता. न्यायदान कक्षात क्षमतेपेक्षा अधिक वकिलांनी गर्दी केल्याने न्यायालयाच्या आदेशाने इतरांना प्रवेश नाकारण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...