आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायबर गुन्हे रोखण्यासाठी विशेष मोहीम, पोलिस यंत्रणा सतर्क

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शहरात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढत असलेले सायबर गुन्हे रोखण्यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. या गुन्ह्यांसह अन्य प्रकार रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून नागरिकांना पत्रक वाटप केले जाणार असून, त्याद्वारे सायबर गुन्हे रोखण्याबाबत जनजागृतीचे उद्दिष्ट आहे. 


सोशल मीडियाचा वाढता वापर आणि ऑनलाइन व्यवहारांमुळे सायबर गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या गुन्ह्यांत इंटरनेटचा वापर अधिक होत असल्याने बहुतांश नागरिक विविध प्रलोभनांना बळी पडतात. अनोळखी कॉल्सना प्रतिसाद देत एटीएम, डेबिट कार्डचा ओटीपी नंबर देतात. नंबर दिल्यानंतर काही वेळात संबंधितांच्या खात्यावरून परस्पर पैशे काढले जातात. पोलिसांकडून अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी सुचना दिल्या जातात. मात्र, नागरिकांचे द्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे सुचना पत्रकामध्येच सायबार गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.


पाेलिसांचा पुढाकार 
पाेलिसांकडून आता सायबर गुन्हे रोखण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. 
- देवराज बोरसे, वरिष्ठ निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे 

बातम्या आणखी आहेत...