आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वेगवेगळ्या शीर्षाखाली एकाच विहिरीवर खर्च; ग्रामसेवक व सरपंचांचा प्रताप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- बागलाण तालुक्यातील साेमपूर ग्रामपंचायतींच्या निलंबित ग्रामसेवक व तत्कालीन सरपंचांच्या कारभाराची गटविकास अधिकाऱ्यांमार्फत करण्यात अालेल्या चाैकशी अहवालात अनेक त्रुटी काढण्यात अालेल्या अाहेत. विशेष म्हणजे ग्रामनिधी, ग्रामीण पाणीपुरवठा, १३ व १४ व्या वित्त अायाेगातून केलेल्या खर्चाची माेघम मंजुरी घेण्यात अाली असून एकाच विहिरीसाठी तीन वेगवेगळ्या शीर्षाखाली खर्च करून शासनाच्या डाेळ्यात धूळफेक केल्याचे समाेर अाले अाहे. 


शासनाच्या विविध याेजनांमध्ये करण्यात अालेल्या अपहारामुळे विभागीय अायुक्त महेश झगडे यांनी साेमपूर ग्रामपंचायत बरखास्त करण्याचे अादेश दिले अाहेत. या अादेशाविराेधात काही सदस्यांनी शासनाकडे दाद मागितली असली तरी ग्रामपंचायतींच्या चाैकशी अहवालात अनेक गंभीर बाबी समाेर अाल्या अाहेत. गावातील विहिरीच्या कामासाठी ग्रामनिधी, १३ व १४व्या वित्त अायाेगातून खर्च करण्यात अाला अाहे. विहिरीच्या खाेदकाम व बांधकामाचे मूल्यांकन व अंदाजपत्रक नसतानाच खर्च करण्यात अाला अाहे. ग्रामपंचायत करांची वसूल केलेली रक्कम बँकेत भरणा न करता परस्पर खर्च करण्यात अाली अाहे. मृतांच्या नावे शाैचालय अनुदान, राेपे खरेदी, इलेक्ट्रिकल दुरुस्ती अशा कामांमध्ये अनियमितता अाढळून अाल्याचे अहवालात नमूद करण्यात अाले अाहे. 

बातम्या आणखी आहेत...