आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईचा 'एमडी' स्टाॅकिस्ट तस्कर गजाआड, सात पिस्तूल हस्तगत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- घातक अमली पदार्थ एमडीच्या मुख्य तस्कराला मुंबईमध्ये अटक करण्यात अाली. संशयिताकडून ४४ लाखांचे २२०० ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि ८० लाखांची जग्वार कार असा एक कोटी २४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथे ही धडक कारवाई केली. विशेष म्हणजे या तस्कराच्या संपर्कात असलेला गावठी पिस्तूल विक्री करणाऱ्या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळत सात गावठी पिस्तूल व २५ जिवंत राउंड जप्त करण्यात आले. 


याप्रकरणी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. बुधवारी (दि. १६) पाथर्डी फाटा येथे संशयित रणजित मोरे, पंकज दुंडे, नितीन माळोदे यांना २६५ ग्रॅम एमडी अमली पदार्थासह अटक केली होती. संशयितांकडून टाटा सफारी आणि एमडी असा १६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. अमली पदार्थ विक्री करणाऱ्या रॅकेटच्या मुळापर्यंत पोहाेचण्याचे आदेश डॉ. सिंगल यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. 


संशयिताकडून शस्त्रांचीही तस्करी 
संशयित रणजित मोरे याचे आणि एमडी तस्करांचे संबंध चौकशीत स्पष्ट झाले. माेरेनेच शहरात पिस्तूल विक्री केल्याची माहिती पुढे आली. निगेहबान इम्तियाज खान (रा. टिटवाळा), दीपक राजेंद्र जाधव (रा. पंचवटी), अमोल भास्कर पाटील (रा. म्हसरूळ टेक) यांना सात गावठी पिस्तूल विक्री केल्याची माहिती पुढे आली. संशयितांकडून सात गावठी पिस्तूल व २५ जिवंत काडतूस जप्त करण्यात अाले असून इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. 


नाशिक कनेक्शन उघड 
मुंबईमध्ये अमली पदार्थ विक्रीचे मोठे रॅकेट उघडकीस येणार आहे. दोन संशयितांना अटक केली आहे. शहरात कुठे अमली पदार्थाची विक्री केली याची धक्कादायक माहिती संशयितांनी चौकशीत दिली आहे. काही तस्करांची नावे निष्पन्न झाली आहेत. दोन दिवसांत मोठे रॅकेट उघडकीस येणार असल्याची माहिती तपासी अधिकाऱ्यांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...