आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात अायसीयूच्या खिडकीतून उडी घेत रुग्णाची अात्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- आजाराला कंटाळून नाशिकच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन एका रुग्णाने अात्महत्या केली. ही घटना बुधवारी घडली. किसन पाटोले (५६) असे मृत रुग्णाचे नाव अाहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर संदर्भ सेवा रुग्णालयाच्या हृदय विभागात  उपचार सुरू हाेते.  किसन नाना पाटोले  यांना ४ फेब्रुवारी राेजी रुग्णालयात दाखल करण्यात अाले हाेते. बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पाटोले यांनी रुग्णालयाच्या अायसीयूच्या खिडकीतून उडी घेतली. खाली पडल्याने त्यांच्या डाेक्याला गंभीर मार लागला, यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच रुग्णालय परिसरात कर्मचाऱ्यांची पळापळ झाली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने पाेलिसांना पाचारण केले.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो...

बातम्या आणखी आहेत...