आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नदीजोड'मध्ये सिन्नरसाठी पाणीे, प्रकल्प अहवालाकरिता सर्वेक्षण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर- गारगाई-अपर वैतरणा-कडवा-देवनदी लिंक या नदीजोड प्रकल्पास राज्य सरकाराने तत्त्वत: मान्यता दिल्यानंतर सिन्नर तालुक्यातील पाणी वितरणाबाबत प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. खासदार हेमंत गोडसे, आमदार राजाभाऊ वाजे यांच्यासह अधिकाऱ्यांनी कोनांबे येथे क्षेत्र पाहणी केली. 


जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, हैदराबाद येथील राष्ट्रीय जलविकास अभिकरणाचे मुख्य अभियंता श्रीनिवास, अधीक्षक अभियंता डी. आर. शर्मा, कार्यकारी अभियंता पी. बी. रामाराजू, अधीक्षक अभियंता एन. जी. राव, जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, पंचायत समितीच्या सभापती सुमन बर्डे, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, पंचायत समिती सदस्य जगनपाटील भाबड, सरपंच नामदेव शिंदे, संजय सानप, अशोक डावरे, सरपंच संजय डावरे, रामनाथ पावसे आदी उपस्थित होते. अभिकरणाच्या अभियंत्यांनी शिवडे घाटातील भौगोलिक स्थितीची पाहणी केली. 


प्रकल्प अहवालास येणाऱ्या २३ कोटी रुपये खर्चासही राज्य सराकारने तत्त्वत: मान्यता दिली असल्याची माहिती खासदार गोडसे, जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष जाधव यांनी दिली. सिन्नर तालुक्यासाठी ७ हजार दशलक्ष घनफूट इतके पाणी उपलब्ध होणार आहे. तालुका पर्जन्यछायेच्या प्रदेशात येत असल्याने शेतीसाठी पाणी योजना नव्हती. त्यामुळे नदीजोड प्रकल्प केंद्र व राज्य सरकारकडे सुचवण्यात आला होता. दीड वर्षाच्या पाठपुराव्यानंतर त्यास तत्त्वत: मान्यता मिळाली. आता प्रकल्प अहवाल तातडीने तयार करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले असल्याचे गोडसे यांनी सांिगतले. कडवा धरणापर्यंत प्रकल्प अहवाल तयार झाला असून सिन्नर तालुक्यातील वितरण व पाइपद्वारे जोडण्यात येणारा नदीजोड प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. 


कोनांबे येथे पाहणी करताना खासदार हेमंत गोडसे, आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, जलविकास अभिकरणाचे श्रीनिवास, डी. आर. शर्मा, नीलेश केदार, राजेंद्र जाधव, सुमन बर्डे आदी. 


असा आहे प्रकल्प 
गारगाई-वाघ, वाल नद्यांवर पाच धरणे बांधून सात हजार दशलक्ष घनफूट पाणी वैतरणा धरणात लिफ्टद्वारे टाकण्याचे प्रयोजन आहे. कडवातून पुन्हा पाणी लिफ्ट करून सोनांबे येथे बंधाऱ्यात सोडण्यात येईल. तेथून डुबेरे, रामोशेवाडी, दापूर, दोडी, नांदूरशिंगोटे या गावांमार्गे भोजापूरला पाणी देण्यात येईल. हेच पाणी पुढे निमोण, तळेगाव, रांजणगाव, मिरपूर, निर्मल पिंप्री, कोऱ्हाळे, काकडी, शिर्डीलाही देण्याचे प्रयोजन आहे. २१०० दलघफू पाणी देवनदीत, २ हजार ६०० दलघफू पाणी सिन्नर, माळेगाव औद्योिगक वसाहतीस, तर १ हजार ५०० दलघफू पाणी भोजापूर कालव्यास सोडण्यात येणार आहे. ८०० दलघफू पाणी शिर्डीसाठी प्रस्तावित आहे. 

बातम्या आणखी आहेत...