आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंगावरून वाळूचा ट्रक गेल्याने सत्यगाव येथील शिक्षक बाळकृष्ण दराडेंचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येवला- नुकत्याच जन्माला अालेल्या मुलाला भेटण्यासाठी जाणाऱ्या सत्यगाव येथील शिक्षक बाळकृष्ण शांताराम दराडे (३६) यांच्या पोटावरून वाळू वाहतूक करणारा हायवा ट्रक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी (दि. २६) रोजी दुपारी १ ते २ च्या दरम्यान जळगाव नेऊर ते मुखेड रस्त्यावर ही घटना घडली. प्लॅटिना दुचाकीवर असलेले दराडे हे सत्यगाव येथे चिमुकल्याला भेटायला जात असताना ही घटना घडली. ही माहिती परिसरात कळल्यावर जळगाव नेऊर येथील तरुण अपघातस्थळी मदतीसाठी धावले. त्यांनी शरीराचे तुकडे गोळा करून रुग्णवाहिका येईपर्यंत मृतदेह लिंबाचा पाला, कापड टाकून झाकून ठेवला होते. ज्या हायवा ट्रकखाली दराडे यांचा मृत्यू झाला. त्याच्या चालकाने अपघातानंतर पलायन केले. 


दराडे हे उमराणे (ता. देवळा) येथील छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पत्नी कांचन या निफाडला वैनतेय हायस्कूलमध्ये शिक्षिका असून निफाडला गणेशनगर येथे राहतात. मुलगी प्रांजल प्राथमिक शिक्षण घेत आहे. परिवारात नुकतेच मुलाचे आगमन झाल्याने आनंदाचे वातावरण असताना चिमुकल्याला भेटण्यासाठी दराडे हे गावी येत असताना हा अपघात झाला. 


तरुणांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी येवला येथे पाठवला. माजी उपसरपंच प्रकाश शिंदे, माजी सैनिक योगेश शिंदे, आठवण कलेक्शनचे तौसिफ शेख, 'संस्कृती पैठणी'चे गोविंद तांबे, सागर कुऱ्हाडे, गणेश तांबे, केदारनाथ शिंदे, भावराव शिंदे, बाळासाहेब कुऱ्हाडे, किशोर दौंडे, आबा घुले, सागर शिंदे, संजय कदम यांनी मदतकार्यात पुढाकार घेतला हाेता.

बातम्या आणखी आहेत...