आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगावला पारा ४४.८ अंश सेल्सिअस, नाशिकचे तापमान ३७.८ वर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव- गेल्या दाेन दिवसांपासून मालेगावच्या कमाल तपमानात वाढ झाली अाहे. साेमवारी येथील तपमान ४४.८ अंश सेल्सिअस नाेंदविले गेले. वाढत्या उष्णतेने मालेगावकर घामाघूम झाले अाहेत. दरम्यान, नाशिकमध्ये ३७.८ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद करण्यात आली. 


राज्यात काही ठिकाणी अतिउष्णतेची तर काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता पुणे हवामानशास्त्र विभागाने वर्तविली अाहे. मालेगावला तर मे महिन्याच्या प्रारंभीच पारा ४४.६ अंशांवर पाेहाेचला हाेता. मध्यंतरी पारा दाेन अंशाने कमी हाेऊन ४२ अंशांवर स्थिरावला हाेता. मात्र, रविवारी पारा ४४ अंशांच्या पुढे पाेहाेचला. उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्त्यांवर काहीसा शुकशुकाट दिसून येत आहे. पुढील काही दिवस चटका देणारे ऊन पडण्याची शक्यता असल्याने जनता उन्हाच्या तडाख्याने हाेरपळून निघणार अाहे. 

बातम्या आणखी आहेत...