आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नाशिक - अल्पवयीन मुलीस शौचालयात नेऊन अनैसर्गिक अत्याचार करणारा आरोपी सचिन हिरामण पाटील याला न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. नांदूरनाका परिसरात रामदास जॉकीनगरमध्ये हा विकृत प्रकार घडला होता. बुधवारी (दि. २५) न्या. सुचित्रा घोडके यांनी ही शिक्षा सुनावली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर २०१६ मध्ये औरंगाबादरोडवरील मजूर कुटुंबीयांतील एका सहा वर्षीय मुलीस सचिन पाटीलने जिवे ठार मारण्याची धमकी देत शौचालयात नेले व अत्याचार केला. तसेच, जखमी केले. याबाबत कुणास काही सांगितले तर चाकूचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन उपनिरीक्षक धनश्री पाटील यांनी सबळ पुरावे गोळा केले. अाराेपीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी सुरू होती. बुधवारी खटल्याचा निकाल लागला. न्या. घोडके यांनी साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुराव्याच्या अाधारे दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाकडून श्रीमती व्ही. डी. जाधव यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी आर. एस. जोशी, कोर्ट कर्मचारी एस. एस. गायकवाड यांनी पाठपुरावा केला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.