आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होळीच्‍या मिरवणुकीवरून युवकांना मारहान, तीन जखमी; यावलमध्‍ये तनावाचे वातावरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- शहरात गुरूवारी रात्री साडे आठ वाजेच्‍या सुमारास होळीचा दांडा ( ऐरंडीचे झाड ) घेऊन निघालेल्‍या मिरवणुकी दरम्‍यान युवकांना मारहण केल्‍याची घटना येथील नगीना मस्जिद चौकात घडली. यानंतर दोन गट समोरा-समोर आल्‍याने शहरातील बुरुज चौक ते संभाजी पेठ भागात काही काळ तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. मनोज सुनिल इंगळे ( वय १८ ), हर्षल नंदकिशोर भोईटे ( वय १८ ), व ज्ञानेश्वर ललित देवरे ( वय १७ )  असे घटनेतील जखमी युवकांचे नाव आहे. होळी मुळे तालुक्यात इतर ठिकाणी बंदोबस्तात पोलिस व्यस्त असल्यामुळे तोकड्या पोलिसांच्‍या बळावर जमावावर नियंत्रण मिळविण्यात आले. घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक योगेश तांदळे व पोलिस निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांनी भेट देऊन जमाव शांत केला. रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

 

येथे शहरात यापूर्वी दिवाळीच्या काळात दुकानाचे ओट्यावर फटाके उडविण्याच्या कारणावरून असाच तणावाचा प्रकार घडला होता. या पार्श्वभूमीवर शहरात अती संवेदनशिल भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अपेक्षित असतांना ' याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या शिवजयंती, होळी व आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेण्यात न आल्याने काही शांतता समिती सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, जखमींचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...