आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अंतिम मुदत 27 जूनपर्यंत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - अभियांत्रिकी, औषधनिर्माणसह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी २७ जून ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत प्रमाणपत्र सादर न केल्यास संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेश खुल्या गटात ग्राह्य धरण्यात येतील. त्यानुसार जागावाटप होणार आहे. 

 
शासनाच्या नवीन निर्णयानुसार इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना २३ पर्यंत जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी प्रकरण दाखल केल्याची पावती फॅसिलिटेशन सेंटरमध्ये दाखल करावी लागेल. फार्मसीसाठी २२ जून, आर्किटेक्चरसाठी २४ जून तर हॉटेल मॅनेजमेंटसाठी २६ जून ही अंतिम मुदत आहे. या सर्व अभ्यासक्रमांसाठी २७ जून ही प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.

 

बातम्या आणखी आहेत...