आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांना येईना मातृभाषेतून वाचन, गणितातही निम्मे कच्चे; ‘असर’चा निष्कर्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- देशातील २५% विद्यार्थ्यांना मातृभाषेतील दुसऱ्या इयत्तेतील वाक्ये वाचता येत नाहीत. ४३ टक्के विद्यार्थी भागाकार करू शकत नाहीत. तसेच  फक्त ५३% विद्यार्थीच इंग्रजीचे वाचन करू शकले, असे  धक्कादायक निष्कर्ष  ‘प्रथम’ संस्थेतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘असर २०१७’ च्या पाहणी अहवालातून पुढे आले आहेत. यंदा देशातील १४ ते १८ वयोगटातील ३० हजार विद्यार्थ्यांच्या मूलभूत शैक्षणिक गुणवत्तेचा अभ्यास या पाहणीत करण्यात आला. यात राज्यातील अहमदनगर आणि सातारा या दोन जिल्ह्यांचा समावेश होता. ४२% विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत कामही करावे लागते, पण ९९% विद्यार्थ्यांनी शेती करायची नाही असे या सर्वेक्षणात सांगण्यात अाले.  देशातील प्राथमिक शिक्षणाच्या दर्जाचे मूल्यमापन करण्याच्या उद्देशाने दरवर्षी ‘असर’ अहवाल प्रकाशित करण्यात येतो. दरवर्षी ५ ते १६ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची पाहणी यात करण्यात येते. यंदा मात्र १४ ते १८ या प्राथमिक शिक्षणाच्या पुढील गटाची पाहणी करण्यात आली. त्यात २४ राज्यांतील २८ जिल्ह्यांमधील १६१४ गावांमधील ३० हजार विद्यार्थ्यांचा समावेश हाेता. देशभरातील ३५ संस्थांच्या २ हजार स्वयंसेवकांनी हे सर्वेक्षण केले.

 

> २५% विद्यार्थी मातृभाषा वाचू शकले  
> ४३%  विद्यार्थी गणित सोडवू शकले 
> ५३% विद्यार्थी इंग्रजी वाक्य वाचू शकले  
> ५२% विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत करावे लागते  काम
> ७२% विद्यार्थी वापरतात मोबाइल  

> ६०% विद्यार्थ्यांना पदवीचे शिक्षण घ्यायचे आहे  
> ४०% विद्यार्थ्यांसमोर आदर्श नाही  
> १८% मुलाला जवान किंवा पोलिस व्हायचंय  

> २५% मुलींना शिक्षिका व्हायचंय  

> ९९% विद्यार्थ्यांना शेती करायची नाही 

 

अहवालातील निष्कर्ष  

- ८६% विद्यार्थी औपचारिक शिक्षण व्यवस्थेत   
- ५% विद्यार्थी व्यावसायिक प्रशिक्षण घेत आहेत  
- ४२% विद्यार्थी शिक्षणासोबत कामही करीत आहेत  
- ७९ % विद्यार्थ्यांना घरच्या शेतातील काम करावे लागते  
- २५ % विद्यार्थी मातृभाषेतील मूलभूत वाक्ये वाचू शकत नाही 
- ४३% विद्यार्थी गणित साेडवू शकले नाहीत

- ५३% विद्यार्थीच इंग्रजी वाचू शकले

 

नकाशावरून परीक्षा  
- ८६ % विद्यार्थ्यांनी हा भारताचा नकाशा ओळखला 

- ६४ % विद्यार्थी देशाची राजधानी सांगू शकले 

- ७९ % विद्यार्थी स्वतःच्या राज्याचे नाव दाखवू शकले 
- ५२ % विद्यार्थी नकाशावर अापले राज्य दाखवू शकले  


नेटिझन्स विद्यार्थ्यांचे प्रमाण  
- ७२.६ % विद्यार्थ्यांकडे माेबाइल  
- २८ % इंटरनेट वापरकर्ते  
- २५ %  संगणक वापरकर्ते

बातम्या आणखी आहेत...