आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘डीएमएलटी’च्या लॅब सर्वाेच्च न्यायालयाने ठरवल्या अनधिकृत; डाॅ. संदीप यादव यांचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गुजरात व मध्य प्रदेश येथील उच्च न्यायालयाच्या अादेशावर शिक्कामाेर्तब करीत सर्वाेच्च न्यायालयाने डी.एम.एल.टी. तंत्रज्ञांना स्वत: पॅथाॅलाॅजी लॅब चालवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय साेमवारी दिल्याचा दावा महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथाॅलाॅजिस्ट अॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्टचे अध्यक्ष डाॅ. संदीप यादव यांनी केला. यापुढे एम.डी. पॅथाॅलाॅजिस्टच्या पर्यवेक्षणाखाली अाणि त्यांनाच संबंधित चाचणी अहवाल प्रमाणित करण्याचा अधिकार असेल, असेही त्यांनी सांगितले.


राज्यात रक्तसंकलन केंद्रांच्या नावाखाली अनधिकृत पॅथाॅलाॅजी लॅब चालवला जात असल्याचा मुद्दा चर्चेत हाेता. बड्या काॅर्पाेरेट लॅबकडून ७० टक्के कमिशन देत अशा छाेट्या व अनधिकृत लॅबच्या माध्यमातून रक्तसंकलनाचा धंदा थाटल्याचे उघड झाले हाेते. ‘दिव्य मराठी’ने विशेष वृत्तमालिकेद्वारे त्यावर प्रकाश टाकला हाेता.


 दुसरीकडे, महाराष्ट्र पॅथाॅलाॅजी असाेसिएशनही त्याविराेधात अाक्रमक हाेती. नियमानुसार एम.डी. पॅथाॅलाॅजिस्टनेच पॅथाॅलाॅजी लॅब चालवणे अपेक्षित असून, राज्यात दहा हजारांपेक्षा अधिक अनधिकृत लॅब असल्याचा संघटनेचा दावा हाेता. गुजरात व मध्य प्रदेश येथील उच्च न्यायालयानेही एम.डी. पॅथाॅलाॅजिस्टलाच लॅब चालवता येईल, असा निर्णय दिला हाेता. त्याविराेधात तेथील राज्य शासनाने सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली हाेती. त्यात महाराष्ट्र पॅथाॅलाॅजी असाेसिएशनही सहभागी झाले हाेते. 


त्यावर साेमवारी सर्वाेच्च न्यायालयाने निकाल देताना डी.एम.एल.टी. तंत्रज्ञांना स्वत: पॅथाॅलाॅजी लॅब चालवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. एम.डी. पॅथाॅलाॅजिस्टच्या पर्यवेक्षनाखाली अाणि त्यांनाच संबंधित चाचणी अहवाल प्रमाणित करण्याचा अधिकार असेल, असेही स्पष्ट केल्यामुळे त्याचे स्वागत महाराष्ट्र पॅथाॅलाजी असाेसिएशनने केले. या निर्णयाबाबत अाता राज्यभरात जागृती करून अनधिकृत लॅब बंद करण्यासाठी महाराष्ट्रातील सरकारला उद्युक्त केले जाणार असल्याचे यादव यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...