आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनमाड- पालकांनी सारखा अभ्यास करण्याचा तगादा लावल्याने छत्तीसगड येथील रायगड जिल्ह्यातील इयत्ता सहावीत शिकणारे १४ वर्षीय तीन मुले मनमाडला पळून आल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. मात्र, पोलिसांच्या सतर्कपणामुळे मुले त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आली. निखिल लखन सिंग, बिपीन दीपक मिश्रा आणि मोहम्मद मुमताज मोहम्मद इजहार अशी मुलांची नावे आहेत.
मनमाड रेल्वे स्थानकावर भुवनेश्वर-लोकमान्य टिळक एक्स्प्रेसची पाहणी करताना फलाट क्र. ३ वर तीन अल्पवयीन मुले उतरल्याचे हवालदार साबीर शहा यांनी पाहिले. त्यांच्याबरोबर पालक किंवा इतर कोणतीही मोठी व्यक्ती नसल्याने शाह यांना संशय आला. त्यांनी या मुलांना रेल्वेस्थानक सुरक्षा बल पोलिस ठाण्यात आणले. अधिकारी आर. के. मीना व आर. के. यादव यांनी मुलांची चौकशी केल्यानंतर त्यांनी नावे व पत्ता सांगितला. त्यानुसार हे तिघे छत्तीसगडमधील रायगड जिल्ह्यातील विवेकानंद हायस्कूलचे विद्यार्थी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार त्यांच्या पालकांना मनमाडला बोलावून घेण्यात आले. पालकांनी आपण अभ्यास करण्यास मुलांना सांगितल्याने ती मुले पळून आल्याचे सांगितले. या तिन्ही मुलांना रेल सुरक्षा बल अधिकारी आर. के. मीना, आर. के. यादव यांनी पालकांच्या स्वाधीन केले. शाह यांनी प्रसंगावधान दाखवून या मुलांच्या सुटकेसाठी पुढाकार घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.