आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात मधील तापी नदीमध्‍ये बुडून यावल तालूक्‍यातील तिघांचा मृत्‍यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- तालुक्यातील गिरडगाव येथील दोन तर किनगाव येथील एका तरूणाचा गुजरात राज्यातील बौधान गाम ता. मांडवी जि. सुरत येथे तापी नदीत बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी (दि. २) रंगपंचमीच्या दिवशी दुपारी घडली. घटनेने तालुक्यातील शोककळा पसरली आहे. तीघे तरूण कामा निमित्त बारडोली (गुजरात) येथे राहत होते.

 

शशीकांत मोतीराम पाटील(२७), डिगंबर पुडंलिक पवार (२५) रा. गिरडगाव आणि डिगंबर पुडंलिक पवार (२५) असे तीघांचे नाव असून गुजरातमधील सुरत जिल्‍ह्यातील बारडोली येथे तीघेही कंपनीत कामाला होते. सुरत जिल्‍ह्यातील नदी काठच्या बौधान गाम येथे रंगोत्सवाचा मोठा मेळा लागतो तेथे ते रंगपंचमी खेळण्यास गेले होते. दुपारी तीघेही तापी नदी पात्रात अंघोळीला पाण्यात उतरले मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तीघांचा बुडून मृत्यू झाला. दुर्घटनेची माहीती किनगाव व गिरडगाव या दोन्ही गावासह परिसरात शोककळा पसरली. रात्री उशीरा पर्यंत मांडवी पोलिसांकडून मृतदेहांची उत्तरीय तपासणी सुरू होती तर शनिवारी मृतदेह मिळणार असल्‍याची माहिती मिळते आहे. किनगावचे संजय सयाजीराव पाटील, गिरडगावचे पोलिस पाटील अशोक पाटील यांच्या वतीने गुजरात येथे पाठपुरावा सुरू आहे. 

बातम्या आणखी आहेत...