आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक मनपाच्या अायुक्तपदी तुकाराम मुंढे यांची बदली, राजकीय वर्तुळात खळबळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- काेणत्याही पदावरील नियोजित कार्यकाळ पूर्ण हाेण्याअाधीच बदली ओढवलेले आणि स्थानिक लाेकप्रतिनिधींशी संघर्षामुळे बहुचर्चित ठरलेले तुकाराम मुंढे यांची नाशिक महापालिकेच्या अायुक्तपदी अचानक नियुक्ती झाल्याने प्रशासनासह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एक वर्ष सात महिन्याच्या उण्यापुऱ्या काळात अडचणीत असलेल्या महापालिकेला उभारी देण्यासाठी प्रभावी कामगिरी करणाऱ्या अभिषेक कृष्णा यांची उचलबांगडी झाली असून आता ते एमअायडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी असतील.

 

महापालिकेचे तत्कालीन अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांचे नगरसेवकांशी खटके उडू लागल्यानंतर सिंहस्थ कुंभमेळा अाटाेपताच ८ जुलै २०१६ राेजी महापालिका अायुक्तपदी कृष्णा यांची नियुक्ती झाली. पुणे परिवहन मंडळातून बदलून अालेल्या कृष्णा यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर समस्यांचा जणू 'अभिषेकच' महापालिकेवर घातला गेलेला हाेता. मात्र, पहिल्याच प्रतिक्रियेत त्यांनी सर्व समस्यांना उत्तर शाेधणार अशी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करीत कामकाजाला सुरूवात केली. त्यानंतर अल्पावधीतच त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय हातावेगळे केले. बेशिस्त अधिकाऱ्यांचा कटू भाषेत समाचार घेण्याच्या बेदरकारपणामुळे त्यांची बदनामीही झाली हाेती मात्र नगरसेवक व शिस्तबद्ध अधिकाऱ्यांसमवेत सुयाेग्य वर्तनामुळे त्यांची प्रशंसाही हाेत हाेती असे असताना गेल्या काही दिवसांपासून कृष्णा यांच्या बदलीची चर्चा हाेती. खासकरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २६ डिसेंबर २०१७ राेजी क्रेडाईच्या शेल्टर प्रदर्शनाच्या समाराेपाप्रसंगी अायुक्तांच्या बदलीबाबत पालकमंत्री तथा अामदारांना संकेत दिल्याची चर्चा हाेती.


त्या पार्श्वभूमीवर अलीकडेच महापालिकेसाठी सुसह्य नसले तरी, केवळ मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील म्हणून महत्वाच्या प्रकल्पांना कृष्णा यांनी गती दिल्यामुळे त्यांची बदली टळेल अशी अपेक्षा असताना मंगळवारी दुपारी ३ वाजता एकाएकी कृष्णा यांच्या बदलीचे अादेश निघाले. त्यांच्या जागी मुंढे यांची नियुक्ती झाली असून बदलीनंतर कृष्णा यांना भेटण्यासाठी नगरसेवक, अधिकाऱ्यांनी एकच गर्दी केली. मात्र निराशेमुळे त्यांनी भेट टाळली.

 


कृष्णा यांची कामगिरी
- एेतिहासिक भंगार बाजार तब्बल दाेनवेळा हटवला.
- राष्ट्रीय हरित लवादाचे निर्बंध उठवून बांधकाम परवानगीचा मार्ग केला माेकळा
- खत प्रकल्पाचा ३० वर्षाचा ठेका देवून कचरा विल्हेवाटीचा प्रश्न साेडवला
- कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा जीअायझेड प्रकल्प लावला मार्गी
- नऊ मीटर रस्त्यावरील कपाटाचा प्रश्न साेडवून रखडलेल्या इमारतींना परवानगी
- छाेट्या रस्त्यावरील इमारतींना मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला प्रस्ताव
- पाच वर्षासाठी घंटागाडीचा ठेका; बेशिस्त ठेकेदारांना सर्वाधिक दंड
- शहरात ४ लाख मिळकतीचे सर्वेक्षण करून ६० नव्या मिळकती शाेधल्या
- बऱ्याच वर्षानंतर पाणीपट्टी व घरपट्टीत शंभर टक्के वसुलीची चिन्हे
- जल लेखापरीक्षण करून ४० टक्के पाणी गळती शाेधली.


मुंढे आणि 'हॉट' सीट
२००५ मध्ये साेलापूरमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या तुकाराम मुंढे यांची कारकिर्द अत्यंत वादळी अशीच अाहे. सर्वसाधारपणे अधिकाऱ्यांची तीन वर्षाच्या कार्यकाळानंतर बदली हाेते. मात्र मुंढे यांच्या अारंभापासूनच कार्यकाळ पूर्ण हाेण्याअाधीच तडकाफडकी बदल्या झाल्या अाहेत. लाेकप्रतिनिधींशी संघर्ष हे त्यामागचे प्रमुख कारण राहिले अाहे. मुंढे यांनी भ्रष्टाचार बाहेर काढल्यामुळेही ते वादग्रस्त ठरवले गेल्याचे सांगितले जाते. मात्र काही असले तरी त्यांचा दबदबा कायमच प्रत्येक नियुक्तीच्या ठिकाणी राहिलेला अाहे. २००७ मध्ये साेलापूर येथून दाेन वर्षात बदलीने नांदेड येथे सहजिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झाले. तेथे अवघ्या चार महिन्यांत म्हणजेच जानेवारी २००८ मध्ये त्यांची नागपूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. येथे जेमतेम १४ महिने कामकाज केल्यानंतर मार्च २००९ मध्ये त्यांची नाशिक अादिवासी विकास अायुक्तालयात अतिरिक्त अादिवासी अायुक्त म्हणून मार्च २००९ ला नियुक्ती झाली व तेथून पाच महिन्यांत म्हणजेच जुलै २००९ मध्ये वाशिम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली. तेथे दहा महिने काम केल्यानंतर जून २०१० मध्ये मुंबईत खादी अाणि व्हिलेज इंडस्ट्री याेजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली. येथे एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर जून २०११ मध्ये त्यांची जालना जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. तेथे चाैदा महिने कामकाज केल्यानंतर त्यांची सप्टेंबर २०१२ मध्ये मुंबईत विक्रीकर विभागात सहअायुक्त म्हणून नियुक्ती झाली. येथे मात्र जवळपास दाेन वर्ष दाेन महिने कार्यरत हाेते. त्यानंतर साेलापूर जिल्हाधिकारीपदी नाेव्हेंबर २०१४ मध्ये त्यांची बदली झाली. एप्रिल २०१६ मध्ये म्हणजेच जवळपास अठरा महिन्यांत काॅंग्रेस अामदारांशी मतभेदामुळे नवी मंुबई महापालिकेत ते रुजू झाले. येथे तर सर्वपक्षीय नगरसेवकांच्या अांदाेलनामुळे त्यांची बदली राज्यभरात गाजली. मुख्यमंत्र्यांनाही दबावामुळे त्यांची बदली करण्याची वेळ अाली. अर्थात नवी मुंबईत राजकीय धेंडांची अतिक्रमणे काढल्यामुळे त्यांना नागरिकांचा पाठिंबा असल्याचेही बाेलले जात हाेते. मार्च २०१७ मध्ये त्यांची पुणे परिवहन महामंडळ लिमिटेड येथे बदली झाली हाेती. या ठिकाणी बेशिस्त बसचालकांविराेधातील कारवाईमुळे ते चर्चेत हाेते. तेथे जेमतेम ११ महिने कामकाज केल्यानंतर आता नाशिक येथे बदली झाली.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...