आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार समितीतील दाेघा लिपिकांना लाच घेताना अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कर्मचाऱ्याकडून पदोन्नतीसाठी ४ हजार ४०० रुपयांची लाच स्वीकारताना बाजार समितीचा मुख्य लिपिक महेंद्र मनोहर निकाळे (५३) लिपिक शंतनू नथुराम झोमन (४७) या दोघांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. शुक्रवारी (दि. ९) सकाळी बाजार समितीच्या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. 


याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार बाजार समिती कार्यालयात लिपिकपदावर कार्यरत आहेत. पदोन्नतीसाठी नाव वरच्या क्रमांकावर आहे. गुरुवारी (दि. ७) कार्यालयात असताना पदोन्नती देण्यासाठी मुख्य लिपिक महेंद्र काळे आणि लिपिक शंतनू झोमन या दोघांनी ४ हजार ४०० च्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. खात्री केल्यानंतर पथकाने कार्यालयात सापळा रचला. दोघांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. दोघांच्या विरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरीक्षक भामरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

बातम्या आणखी आहेत...