आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमडी तयार करणारे दोन ‘रिसर्च सायंटिस्ट’ जेरबंद, बोईसरला केला कारखाना उद्ध्वस्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - एमडी हा अमली पदार्थ बाळगणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू असताना या घातक अमली पदार्थाची निर्मिती करणारे दाेन रिसर्च सायंटिस्ट गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने जेरबंद केले. जग्वार या वाहनासह दोघांना पकडल्यानंतर हे सायंटिस्ट उत्तर प्रदेशात पळून गेले हाेते. पथकाने दाेघांना अटक केल्यानंतर बोईसर येथे   एका फ्लॅटमध्ये एमडीची निर्मिती करणारी प्रयोगशाळाच शोधून काढत तब्बल २५ किलो एमडी जप्त केले.

 

एकूण ३ कोटी २१ लाखांचा मुद्देमाल पाेलिसांनी जप्त केला. राज्यातील माेठी अशी ही पहिलीच कारवाई ठरली आहे. पाथर्डी फाटा येथे रणजित मोरे, पंकज दुंडे, नितीन माळोदे यांना २६५ ग्रॅम एमडीसह अटक करण्यात अाली हाेती. या तिघांच्या चौकशीत एमडीचे स्टॉकिस्ट नदीम सलिम सौरठीय (रा. नागपाडा), सैफुल्ला फारुख शेख (रा. मिरारोड) यांना लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात जग्वार कारसह अटक करण्यात अाली हाेती.

 

त्यांच्याकडून २२०० ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले हाेते.  संशयितांच्या चौकशीत अरविंद कुमार याच्याकडून एमडी घेत असल्याची माहिती मिळाली. मात्र कारवाई झाल्यापासून संशयित उत्तर प्रदेशात फरार झाला होता. पथक चार दिवसांपासून त्याच्या मागावर होते. मुझफ्फरनगर येथे असल्याची माहिती मिळाली. पथकाने जंगल परिसरात संशयितास अटक केली. मुझफ्फरनगर पोलिसांच्या मदतीने चौकशी करण्यात आली असता ताे रिसर्च सांयटिस्ट म्हणून काम करत असल्याची माहिती मिळाली. त्याचा सहकारी बोईसर (जि. पालघर) येथे फ्लॅटमध्ये अंमली पदार्थ तयार करत असल्याचे त्याने सांगितले.


नाशिकहून दुसरे पथक बोईसरला रवाना झाले. त्यांनी प्लॅटवर छापा टाकला असता तेथे मिनी प्रयोगशाळाच आढळली. तेथे हरिश्चंद्र उर्वादत्त पंत यास अटक करण्यात अाली. ४५०० ग्रॅम एमडी, १८ किलो क्रूड पावडर असा १ कोटी ८० लाख ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. 

 

 

बातम्या आणखी आहेत...