आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रमवीर त्रिवेदी यांचे हृदयविकाराने निधन; आज अमरधाममध्ये अंत्यसंस्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नववर्षाचे स्वागत हे व्यसनाधीनते एेवजी चालण्याच्या सुदृढ व्यायामाद्वारे करा, असा संदेश देत २०१३ पासून दरवर्षी गाेल्फ क्लबवर पायी चालत नाशिककरांना संदेश देणारे ‘मॅरेथाॅन वाॅकमन’ म्हणून अाेळख मिळवलेले रंजय त्रिवेदी (४९) यांचे शनिवारी सकाळी हृदयविकाराने राहत्या घरी निधन झाले. या वर्षअखेरीस मुंबईत वांद्रे ते गेटवे आॅफ इंडियापर्यंत ४८ तास पायी चालण्याचा त्यांचा संकल्प अपूर्णच राहिला. 


रविवारी सायंकाळी जुन्या सिडकाेतील सुंदरबन काॅलनी येथील निवासस्थनावरून त्यांची अंत्ययात्रा निघेल. नाशिक अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. त्यांनी २०१३ सालापासून नाशिकच्या जॉगिंग ट्रॅकवर २४ तास सलग पायी चालण्याचा संकल्प पूर्ण केला होता. त्यानंतर २०१४ साली १०० तास चालण्याचा संकल्प करून ताे २०१५ च्या जानेवारीला तडीस नेला. त्यानंतर २०१५ सालच्या वर्षअखेरीस सलग सहा दिवस अाणि रात्र म्हणजेच १४४ तास चालण्याचा विक्रम जानेवारी २०१६ ला पूर्ण केला. 


दरवर्षी असे अापलेच विक्रम मागे टाकत त्यांनी २०१६ साली थर्टी फर्स्टच्या सूर्यास्तापासून पायी फेऱ्या मारण्यास सुरुवात करीत सलग जानेवारी २०१७पर्यंत चालत २०० तास चालण्याचा विक्रम नोंदविला. २०१२ साली अपघातानंतर ते कसेबसे चालू लागले. मात्र, जिद्दीच्या बळावर अापण धडधाकट व्यक्तींपेक्षाही अधिक चालू शकताे, हे त्यांनी २०१३ सालच्या वर्षअखेरीस २४ तास चालून सिद्ध करून दाखवले हाेते. 

बातम्या आणखी आहेत...