आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालखेडच्या अावर्तनासाठी फाेडले 'जलयुक्त शिवार'साठीचेे बंधारे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड-  राज्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी जागोजागी नदी, नाल्यांवर लहान-लहान बंधारे घालून पाणी अडविण्यात येत आहे. मात्र निफाड तालुक्यातील पालखेड पाटबंधारे उपविभागातील अधिकाऱ्यांनी अावर्तनातून पाणीचाेरी हाेऊ नये यासाठी गुरुवारी रानवड, नांदुर्डी, उगाव आणि खेडे येथील बंधारे फोडण्याची कार्यवाही सुरू केली. बंधारे फोडण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला तरी अधिकाऱ्यांनी मनमानी करीत हे बंधारे फोडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 


पालखेड डाव्या कालव्यातून मे महिन्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी दुसऱ्या वा तिसऱ्या आठवड्यात अावर्तन नियोजित करण्यात आले आहे. पालखेड डाव्या कालव्यावरील राजीव गांधी अतिवाहकामधून खेडे, शिवडी गावासाठी पाणीपुरवठा योजनेंतर्गत पिण्याचे पाणी पुरविले जाते. उगाव येथील राजीव गांधी बंधाऱ्यावर पाणीपुरवठा योजना नसल्यामुळे त्याच्या बंधाऱ्यांच्या सर्व फळ्या तळापर्यंत काढण्याचे आदेश देण्यात आले. तर खेडेमधील बंधाऱ्यांच्या सर्व खटक्या तोडण्याचेही आदेश देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नांदुर्डी वाटर सप्लायवरील सर्व भागांतील पाच लहान बंधारे तोडण्यात येणार आहे. तसेच उगाव आणि खेडे येथील पुलाच्या वरच्या बाजूला टाकण्यात आलेला मुरुमदेखील काढून घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नांदुर्डी एस्केपमधून नांदुर्डी ते निफाड गावासाठी पाणी पुरविले जाते, त्या अनुषंगाने नांदुर्डी वाॅटर सप्लायवरील लहान पाच बंधारे तोडण्याचे आदेश देण्यात अाले अाहेत. 


शासनाच्या अभियानाची सहज लावली वाट 
एकीकडे राज्य शासन भूजल पातळी वाढविण्यासाठी जागोजागी लहान-लहान बंधारे घालून पाणी अडवित आहे. तर दुसरीकडे पाणीपुरवठा विभागातील अधिकारी आवर्तनाच्या नावाखाली बांधलेले बंधारे तोडण्याचे काम करीत आहे. त्यामुळे या गावकऱ्यांनी याला विरोध केला, परंतु अधिकाऱ्यांनी विरोधाला न जुमानता आपली कार्यवाही सुरूच ठेवली. त्यामुळे राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाला एकप्रकारे अधिकाऱ्यांकडूनच सुरुंग लावला जात असल्याचे चित्र आहे. 

बातम्या आणखी आहेत...