आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडकाेतील रस्ते अाणि गटारींवरील अनधिकृत बांधकामे हटविणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको- कुटूंब विस्ताराच्या अनुषंगाने इमल्यावर इमले चढवल्यामुळे अनधिकृत बांधकामांचे माहेरघर मानले जाणारे सिडकाे अाता महापालिका अायुक्त तुकाराम मुंढे यांच्या रडारवर अाले असून, 'वाॅक विथ कमिशनर' या कार्यक्रमात सिडकाेला अनधिकृत बांधकामांपासून मुक्त केले जाईल, असा इशाराच त्यांनी दिला अाहे. पहिल्या टप्प्यात रस्ते, गटारीवरील अनधिकृत बांधकामांचे पाडकाम हाेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 


'वाॅक विथ कमिशनर' हा अायुक्तांचा उपक्रम छत्रपती संभाजीराजे स्टेडियम येथे शनिवारी (दि. १९) पार पडला. या कार्यक्रमात एकूण १३४ टोकन वाटप करण्यात आले. त्यात सर्वाधिक तक्रारी अतिक्रमण निर्मूलन विभागाच्याच हाेत्या. राज्य शासनाच्या धाेरणानुसार, अनधिकृत बांधकाम नियमितीकरणासाठी ३१ मे ही मुदत अाहे. या मुदतीत अनधिकृत बांधकाम असेल तर नियमितीकरणासाठी अर्ज सादर करावे, मात्र त्यानंतर काेणतेही अनधिकृत बांधकाम अाढळल्यास त्यावर हाताेडा फिरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 


नाशिकमध्ये सिडकाे काही वेगळे नसून संपूर्ण शहराला जाे न्याय ताेच सिडकाेला लावला जाईल, असेही ठणकावले. लाेकांनीच स्वत:हून अतिक्रमणे वा अनधिकृत बांधकामे काढावी असेही अावाहन त्यांनी केले. 


सर्वसाधारण तक्रारींचाच पडला पाऊस 
सिडकाे विभागातील मैदानांची संख्या वाढवावी, शहर बसेसला थांबा द्यावा, गटारी व चेंबर तुंबतात, कमी दाबाने पाणी येते, कमी व्यासाच्या जलवाहिनीमुळे पाण्याची समस्या भेडसावते, पावसाळ्यात पावसाचे व गटारीचे पाणी घरात येते, संजीवनीनगरला उद्यान करावे, मोकळ्या जागेत व उद्यानात योगा हॉल, विपश्यना केंद्र, अभ्यासिका, सभागृह बांधून मिळणे. सार्वजनिक शौचालयाचे दरवाजे बसवणे, मोकाट जनावरे कुत्र्यांचा त्रास, व्यावसायिकांसाठी मनपाने गाळे उपलब्ध करून द्यावे, घरगुती मालमत्तेचा वापर व्यावसायिक कारणासाठी हाेत असल्यावर कारवाई करणे, गणेश चौक, विवेकानंदशाळा साफसफाई व्हावी, घरकुल योजनेत घरकुल मिळत नाही, स्टेडियमची दुरुस्ती करावी, रो-हाउस परिसराचे अतिक्रमण वाढलेले आहे, शाळेचे विलीनीकरण करू नये, दफनभूमीच्या जागी माती टाकून सपाटीकरण करावे, बाजीप्रभू चौकात पावसाळय़ात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी, बाजीप्रभू चौक, शिवशंकर कॉलनी अभियंतानगर येथे पावसाळ्यात पाणी मोठ्या प्रमाणात साठते, उघड्यावर धुम्रपान करण्यास अटकाव करावा, गणेश उद्यानात झोके दुरुस्ती करावे अशा सर्वसाधारण तक्रारींचा पाऊस पडला. 

 

एकीकडे 'वाॅक विथ कमिशनर' या उपक्रमाद्वारे महापालिका अायुक्त नागरिकांना उपदेेश करण्यासह प्रसंगी तंबीही देण्याची संधी साेडत नसताना दुसरीकडे मात्र पालिका प्रशासनाकडून थेेट मातीवर डांबर अाेतून पॅचवर्क करीत शहराला 'स्मार्ट' करण्याचे काम जाेमात सुरू अाहे. 

बातम्या आणखी आहेत...