आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडिया ग्रेप हार्वेस्ट फेस्टीवल: चित्रकलेतून उलगडला वाईनचा इतिहास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांजेगाव येथील व्यालाेनी विनीयार्डमध्ये रंगरेषांच्या माध्यमातून वाईन फेस्टिवलमध्ये रंगत भरताना चित्रकार. - Divya Marathi
सांजेगाव येथील व्यालाेनी विनीयार्डमध्ये रंगरेषांच्या माध्यमातून वाईन फेस्टिवलमध्ये रंगत भरताना चित्रकार.

नाशिकरोड/ इगतपुरी- मुकणे आणि वैतरणा धरणाचा निसर्ग रम्य परिसर, डोळ्याचे पारणे फेडणारी सह्याद्रीची पर्वतरांग, सभोवताली हिरवा निसर्ग आणि मिळालेली संगीताची साथ अशा सांजेेगावच्या नयनरम्य वातावरणात व्यालोनी विनेयार्ड च्या परिसरात अनेक चित्रकारांनी आपल्या रंग रेषांचा आविष्कार करत 'ग्रेप टू ग्लास थीम 'साकारली. यावेळी चित्रकारांनी वाईनचा इतिहास आपल्या कलेच्या माध्यमातून मांडला होता. 


अखिल भारतीय वाईन उत्पादक संघ, नाशिक व्हॅली वाईन क्लस्टरने इंडिया ग्रेप हार्वेस्ट २०१८ चे आयोजन केले आहे. पिंपळस येथील निफा वाईनरीमध्ये पर्यटकांचा प्रतिसाद लाभल्यानंतर सांजेगाव येथील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद पर्यटकांना मिळावा म्हणून या ठिकाणी 'ग्रेप टू ग्लास' या थीमवर फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईहून आलेल्या सारंग गोसावी यांच्या 'सारंगा' वाद्यवृंदाने प्रेक्षकांची वाहवा मिळवत एकापेक्षा एक सरस गाणी सादर केली होती. उमेश खैरनार आणि कृष्णप्रसाद अय्यर यांनी गीते सादर केली. यावेळी विविध वाईनरीजनी आपली उत्पादने सादर केली. कार्यक्रमास विदेशी पर्यटकांसह पर्यटन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक मुंडावरे यांच्यासह इंडिया ग्रेप हार्वेस्ट महाेत्सवाचे अध्यक्ष जगदीश होळकर, राजेश जाधव, द्राक्ष वाईन उत्पादक संघाचे सचिव राजेंद्र बोरसे, समीर राहणे, मनोज जागता, योगेश कमोद, दीपक निकम उपस्थित होत. 


कलाकारांनी सादर केली कला 
या महाेत्सवात चित्रकार शिशिर शिंदे, रेखा काळभोर, प्रियंका बिराजदार, तुषार हिरे, वरुण भोइर, संतोष मिसाळ, दीपक गरुड, जयेश बोरसे, अंकित शर्मा, संजय दुर्गावड, गोकुळ सूर्यवंशी, महेंद्र जगताप, सोनल बोरसे, हरी धोंगडे या चित्रकारांनी 'ग्रेप टू ग्लास' ही संकल्पना रंगाच्या माध्यमातून हुबेहूब उतरवली होती. याचा अानंद अनेकांनी घेतला. यासोबतच सेलिब्रिटी सेफ शत्रुघ्न सिंग यांनी वाईनपासून तयार करण्यात अालेल्या विविध खाद्यपदार्थ बनवून खवय्यांना चाखायला लावले. 

बातम्या आणखी आहेत...