आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगणकावर पत्ते खेळणारा जिल्हा परिषदेचा वरिष्ठ लिपिक निलंबित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या शरणपूरराेड येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयातील वरिष्ठ सहायक लिपिक अार. के. गांगुर्डे हा कार्यालयात कामकाज करण्याएेवजी संगणकावर दूरचित्रवाणी वाहिनी बघतानाच पत्ते खेळत हाेता. पत्त्यांमध्ये गुंग झालेल्या लिपिकाच्या मागे सुमारे २० मिनिटे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. नरेश गिते हे गुपचूप बसून हाेते. परंतु, पत्त्यांच्या डावात मग्न असलेल्या कर्मचाऱ्यास त्याबाबतची थाेडीही भनक लागली नाही. अखेर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीच अधिक वेळ वाया न घालवता संबंधित कर्मचाऱ्यास तत्काळ निलंबित करण्याचे अादेश दिले. 


शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांकडून कामापेक्षा मनाेरंजनाला महत्त्व दिले जात असल्याचे प्रकार नेहमीच बघण्यास मिळतात. जिल्हाधिकारी कार्यालयासह मनपा विभागीय कार्यालय, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी कर्मचारी संगणकावर इंटरनेट गेम, पत्ते, चित्रपट बघत असल्याचा नागरिकांना अनुभव येताे. ज्या कार्यालयांशी थेट नागरिकांचा संपर्क येत नाही, त्या कार्यालयात तर हे दृश्य नेहमीचेच झाले अाहे. शरणपूरराेेड येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयात संगणकावर दूरचित्रवाणी वाहिनी बघणे आणि पत्ते खेळणे जि.प.च्या वरिष्ठ सहायकास चांगलेच महाग पडले. 

 

शनिवारी (दि. १९) दुपारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या शरणपूररोड येथील कार्यालयात अचानक भेट दिली. यावेळी कार्यालयातील वरिष्ठ सहायक आर. के. गांगुर्डे हे कार्यालयीन वेळेत कामकाजाऐवजी संगणकावर बातम्या बघत असल्याचे व पत्ते खेळत असल्याचे निदर्शनास आले. यात तल्लीन झालेल्या गांगुर्डे यांना डॉ. गिते कार्यालयात आल्याचे व आपल्यामागे बसलेले असल्याचे लक्षातही आले नाही. डॉ. गिते यांनी त्वरित या कर्मचाऱ्यास निलंबित करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा नियमानुसार वरिष्ठ सहायक गांगुर्डे यांना जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...